गुरुवार २५ जानेवारी रोजी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात याच दिवशी शाकंभरी नवरात्रोत्सव संपतो. याच दिवशी गुरु पुष्य योगही तयार होत आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरु पुष्य योग येतो. हा योग तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणतो, खरेदी, व्यवसाय इत्यादी या योगात शुभ आहे. चला जाणून घेऊया पौर्णिमेतील गुरु पुष्य योगामध्ये कोणते ५ उपाय करावेत, ज्यामुळे धनधान्याची प्राप्ती होईल आणि जीवनात आनंद वाढेल.
पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८ वाजून १६ मिनिटांपासून गुरु पुष्य योग तयार होत आहे. पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी २४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजून ४९ मिनिटांनी प्रारंभ होत असून, २५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजून २३ मिनिटापर्यंत आहे.
पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरु पुष्य योगाव्यतिरिक्त रवियोग, अमृत सिद्धी योग आणि प्रीति योग तयार होत आहेत. पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे.
गुरु पुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचे पठण करा. लक्ष्मीला दूध अर्पण करा. भगवान विष्णूला पंचामृत, तुळशीची पाने, गूळ आणि चणे अर्पण करा. लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमचे जीवन समाधानी, सुख-संपत्ती आणि समृद्धीने भरलेले राहील.
गुरु पुष्य योगात सोने आणि पौर्णिमेला चांदीची खरेदी करावी. सोने खरेदी केल्याने तुमचा आनंद वाढेल आणि सुख-समृद्धी नांदेल. सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सोन्यामुळे तुमचे भाग्यही पालटेल कारण हे सोने भगवान बृहस्पतिलाही प्रिय आहे. दुसरीकडे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे.
जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर गुरु पुष्य योगामध्ये हळद खरेदी करा. हळद तुमचे नशीब मजबूत करेल, तुमचे कार्य यशस्वी करेल. हळद तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकते.
गुरु पुष्य योगामध्ये बृहस्पतिचा प्रभाव जास्त असतो. अशा परिस्थितीत तुम्ही पौर्णिमेला गीता, रामचरितमानस इत्यादी धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता.
पौर्णिमेच्या रात्री चंद्र देवाची पूजा करा. रात्री पाण्यात दूध, पांढरी फुले व अख्खा तांदूळ घालून अर्घ्य द्यावे. चंद्र बीज मंत्राचा जप करा.
संबंधित बातम्या