Paush Purnima 2025 Snan-Daan Vel In Marathi : हिंदू वर्षाचा १० वा महिना पौष आहे. पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. या महिन्यात सूर्यदेवाची उपासना केल्यास शुभ फळ मिळते. श्राद्ध कर्म आणि पिंडदानासाठीही पौष महिना अतिशय शुभ मानला जातो.
पौष महिन्यातील पौर्णिमेलाही खास महत्व आहे. वर्ष २०२५ मध्ये सोमवार १३ जानेवारीला पौष पौर्णिमा आहे. पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमाही म्हणतात. या दिवशी शाकंभरी देवी नवरात्र समाप्ती होते. पौष पौर्णिमेला स्नान आणि दान केल्यास शुभ फळ मिळते. पौर्णिमेचे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, तर गंगेच्या पाण्यात डुबकी मारल्याने मनुष्य पापमुक्त होऊन स्वर्गात जातो असे सांगितले जाते.
पौष पौर्णिमेला प्रयागराजमध्ये माघ मेळा (कल्पवास) सुरू होतो. या दिवशी दानालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. दानात गुळ, तीळ आणि ब्लँकेट पासून विशेष पुण्य प्राप्त होते. पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्रासह नारायण आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लोक भगवान सत्यनारायणाची कथा देखील ऐकतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे घरात सुख आणि संपत्ती येते.
पौर्णिमा तिथी प्रारंभ - १३ जानेवारी २०२५ सकाळी ०५:०३
पौर्णिमा तिथी समाप्ती - १४ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ०३:५६
या शुभ दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून ही आंघोळ करू शकता. स्नान करताना सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करावे.
आंघोळीनंतर घरातील मंदिरात दिवा लावावा.
शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा.
सर्व देवी-देवतांना गंगेच्या पाण्याने अभिषेक करा.
पौर्णिमेच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करावी.
भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करा. भगवान विष्णूच्या नैवेद्यात तुळशीचा समावेश करा. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू तुळशीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत. देवाला केवळ सात्त्विक वस्तू अर्पण केल्या जातात हे लक्षात ठेवा.
भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आरती करा. या शुभ दिवशी शक्य तितके भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करा. पौर्णिमेला चंद्राच्या पूजेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा करावी. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने दोषांपासून मुक्ती मिळते.
या दिवशी गरजूंना मदत करा. तुमच्या घराभोवती गाय असेल तर गायीला खायला घाला. गायीला खाऊ घातल्याने अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते.
पौष पौर्णिमेला दिवसभरातून तुम्ही कधीही गंगा स्नान करू शकतात.