Papankusha Ekadashi Vrat Date and Pujan Muhurat 2024 : प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या अकराव्या तिथीला एकादशी व्रत केले जाते. हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्य साधारण महत्व आहे. वर्षभरात २४ एकादशी तिथी येतात. एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. एकादशी व्रत केल्याने मोक्ष प्राप्ती होती असे सांगितले जाते. प्रत्येक एकादशी तिथीचे वेगवेगळे नाव असून, नावाप्रमाणेच महत्व आहे.
दरवर्षी नवरात्रीनंतर पाशांकुशा एकादशी साजरी केली जाते. दरवर्षी पाशांकुशा एकादशी (पापंकुशा एकादशी) दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. हा दिवस जगाचा निर्माता भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. यासोबतच एकादशीचे व्रत पाळले जाते. हे व्रत केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. सुख आणि सौभाग्यामध्येही वाढ होते असे सांगितले जाते. यंदा १२ ऑक्टोबरला दसरा आहे. दुसऱ्या दिवशी एकादशी तिथी आहे. मात्र, पाशांकुशा एकादशीच्या तारखेबाबत लोक संभ्रमात आहेत. चला, पाशांकुशा एकादशीची नेमकी तारीख आणि शुभ वेळ कोणती ते जाणून घेऊया-
एकादशी तिथी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी सुरू होईल आणि १४ ऑक्टोबर २०४ रोजी सकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी समाप्त होईल. १३ ऑक्टोबर २०२४, रविवारी उदया तिथीला पाशांकुशा एकादशी व्रत केले जाईल. तर १४ तारखेला भागवत एकादशीला उपवास केला जाईल.
एकादशी व्रताच्या पारणाची वेळ - पाशांकुशा एकादशी व्रत १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सोडले होईल. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १:१५ ते ३:३३ पर्यंत उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त असेल. पारणतिथीच्या दिवशी हरिवासर समाप्तीची वेळ सकाळी ११.५६ आहे.
ब्रह्म मुहूर्त- पहाटे ४:४० ते ५:३०
प्रातः सन्ध्या- पहाटे ५:५ ते ६:२०
अभिजित मुहूर्त- सकाळी ११:४३ ते दुपारी १२:२९
विजय मुहूर्त- दुपारी २:२ ते दुपारी २:४८ पर्यंत
गोधूलि मुहूर्त- संध्याकाळी ५:५२ ते संध्याकाळी ६:१७
अमृत काळ - संध्याकाळी ५:९ ते ६:३९
पाशांकुशा एकादशीच्या दिवशी राहुकाळ आणि भद्राची वेळ -
राहुकाळ पाशांकुशा एकादशीच्या दिवशी दुपारी ४:२६ ते ५:५२ पर्यंत असेल. भद्राची वेळ १३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:५९ ते ६:२१ पर्यंत असेल.
संबंधित बातम्या