Paryushan Parv Wishes In Marathi: जैन समाजात पर्युषण सणाला विशेष महत्त्व आहे. ३१ ऑगस्टपासून हे पवित्र पर्व सुरू झाले होते. श्वेतांबर पंथाकडून भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी ते शुक्ल पक्षातील पंचमीपर्यंत पर्युषण सण साजरा केला जातो. तर, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीपासून चतुर्दशीपर्यंत दिगंबर हा सण साजरा करतात. ८ दिवसांचे हे पर्युषण आता उद्या म्हणजेच ७ सप्टेंबरला समाप्त होणार आहे. या उत्सवाच्या समारोपाच्या वेळी लोक एकमेकांना मिछमी दुक्कडम् म्हणतात.
जैन धर्माच्या परंपरेनुसार, पर्युषण सणाच्या शेवटच्या दिवशी, क्षमा दिनाच्या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणत एकमेकांकडे माफी आणि आशीर्वाद मागतात. ‘माझ्या विचारातून, शब्दातून किंवा कृतीतून जाणूनबुजून किंवा नकळत तुम्हाला दुखावले असेल, तर मी हात जोडून माफी मागतो’, असे या दिवशी म्हटले जाते. जैन धर्मानुसार मिच्छमी म्हणजे क्षमा आणि दुक्कडम म्हणजे चुकांची क्षमा. म्हणजे माझ्याकडून जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांसाठी मला माफ करा. म्हणजेच ‘मिच्छामी दुक्कडम’चा अर्थ क्षमा मागणे हा आहे. यासोबतच तुम्ही देखील या खास दिवशी आपल्या जैन मित्रपरिवाराला पर्युषण पर्वाच्या समाप्तीच्या शुभेच्छा मेसेजच्या माध्यमातून देऊ शकता.
जग खूप छोटं आहे आणि प्रत्येक पावलावर खूप चुका होतात,
जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या चुकांमुळे मी तुम्हाला दुःखी केलं असेल,
तर क्षमा असावी ही नम्र विनंती...
मिच्छामी दुक्कडम
-----------------
एक फूल कधीच दोनदा उमलत नाही,
एक जन्म दोन वेळा मिळत नाही,
मात्र यावेळी आपल्याला जन्म मिळाला,
तर तो लोकांच्या सेवेत अर्पण करूया
पर्युषण पर्वाच्या शुभेच्छा
नवकार हा माझा श्वास आहे,
जैन धर्म हा माझा विश्वास आहे,
गुरुदेव हेच माझे जीवन आहे,
मी ज्याचा शोध घेत आहे तेच मोक्षदायी पर्युषण पर्व आहे.
-----------------
या संपूर्ण वर्षात जर जाणूनबुजून किंवा अजाणतेपणाने
माझ्या कृती, शब्द किंवा वर्तनासह जर,
मी आपणास किंवा कोणास दुखवले असेल,
तर संवत्सारीच्या या मोठ्या दिवशी
मी क्षमा मागत माझे हात जोडले आहेत.
मिच्छामी दुक्कडम!
-----------------
बाळगावी क्षमा सदाची मनात,
देवत्व देहात जीवनी ह्या!
मिच्छामी दुक्कडम
-----------------
महापर्व पर्युषण तुम्हा-आम्हाला एक संधी देतं,
आपल्या वाईट कर्म आणि विचारांसाठी क्षमा मागा,
आणि चांगलं जीवन व्यतीत करा!
मिच्छामी दुक्कडम