Pateti Wishes : पतेतीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास संदेश, पोस्ट करा आणि स्टेटस ठेवा-parsi new year pateti 2024 wishes in marathi shubhechha post captions quotes status heart touching messages ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Pateti Wishes : पतेतीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास संदेश, पोस्ट करा आणि स्टेटस ठेवा

Pateti Wishes : पतेतीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास संदेश, पोस्ट करा आणि स्टेटस ठेवा

Aug 14, 2024 09:03 AM IST

Pateti 2024 Wishes : बुधवारी १४ ऑगस्टला पारसी नववर्ष म्हणजे पतेती साजरा करण्यात येत आहे. पारशी नववर्ष म्हणजेच पतेतीनिमित्त आपल्या नातलगांना, मित्र-मैत्रिणिंना या शुभेच्छा पाठवून दिवस साजरा करा.

पतेतीच्या शुभेच्छा
पतेतीच्या शुभेच्छा

पतेती हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा ‘पतेती’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी ते अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. पारसी समुदायासाठी ३६० दिवसांचे वर्ष असते, तर उर्वरीत ५ दिवस हे गाथा म्हणण्यासाठी असतात. पर्शियनमध्ये नव आणि रोझ या शब्दांचा अर्थ नवीन आणि दिवस असा होतो. नवरोजला जमशीदी नवरोज, नौरोज, पतेती या नावाने ओळखले जाते.

पर्शियाचा राजा जमशेद यांच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. राजा जमशेद यांनी पारशी दिनदर्शिकेची स्थापना केली असे म्हटले जाते. त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारशी नववर्षाचा उत्सव जमशेद-ए-नौरोज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी विविध पदार्थ बनवून एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात.

बुधवारी १४ ऑगस्टला पारसी नववर्ष म्हणजे पतेती साजरा करण्यात येत आहे. भारतात यंदा पतेती हा सण १४ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. तर १५ ऑगस्टला पारशी समाज नववर्ष साजरे करणार आहे. या दिवसापासून १३९४ पारशी नुतनवर्ष प्रारंभ होत असून, पारशी नववर्ष म्हणजेच पतेतीनिमित्त आपल्या नातलगांना, मित्र-मैत्रिणिंना या शुभेच्छा पाठवून हा दिवस आनंद आणि उत्साहात साजरा करा.

पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन सुरुवात खूप रोमांचक आहे

नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत,

सर्वांना पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा!

राजाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो

हे वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे जावो,

पतेती, पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

येणारे वर्षे तुमच्यासाठी खूप आनंदाची जावो,

पारशी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा

पतेतीच्या खूप खूप शुभेच्छा

नवं पान, नवा दिवस,

नवी स्वप्नं, नवी ध्येयं,

नव्या आशा, नव्या दिशा,

नवी माणसं, नवी नाती,

नवं यश, नवा आनंद.

कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,

नवा हर्ष, नवं वर्ष…!

या सुंदर वर्षासाठी

हॅपी नवरोझ

पुन्हा एक नवीन वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,

सोबत माझ्या नव्या शुभेच्छा

पारसी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

विभाग