Palmistry : तळहातावरील 'या' रेषा मानल्या जातात अशुभ, सोसावा लागतो खूप त्रास
Hast Rekha shastra : तळहातावरील काही रेषा वा चिन्हं शुभ तर काही अशुभ मानल्या जातात. अशुभ रेषा आयुष्यातील संघर्ष आणि संकटांचे संकेत देतात. कुठल्या आहेत या रेषा?
Palmistry : 'आपला हात जगन्नाथ' अशी एक म्हण आहे. हस्तरेषाशास्त्राच्या दृष्टीनं विचार केलास आपला हात किंवा तळहात बऱ्याच गोष्टींचे संकेत देत असतो. तळहातावरील रेषांवरून आयुष्यातील संभाव्य शुभ-अशुभ घटनांचा वेध घेता येतो. तळहातावरील काही रेषा किंवा चिन्हं शुभ मानली जातात तर, काही रेषा अशुभ मानल्या जातात. अशा अशुभ रेषांमुळं संबंधित व्यक्तीला आयुष्यात खूपच त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. जाणून घेऊया कोणत्या आहेत या हस्तरेषा...
ट्रेंडिंग न्यूज
बेट सदृश चिन्ह : हस्तरेषाशास्त्रानुसार, हातावर बेटा सदृश चिन्ह अशुभ असतं. हे चिन्ह व्यक्तीच्या सामाजिक स्थान, मानमर्यादेसाठी घातक असतं. व्यक्तीच्या कल्पनाशक्तीवर या चिन्हाचा विपरीत परिणाम होतो. मन ताब्यात राहत नाही आणि माणसाचा आत्मविश्वास डळमळीत होतो.
अर्धवट लाइफलाइन : तळहातावरची एक लाइफलाइन असते. ही रेषा मध्येच कापली गेली असेल तर ती अशुभ मानली जाते. तसंच या लाइफलाइनला इतर रेषा छेदून जात असतील तर तेही अनिष्ट समजलं जातं. अशा व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.
शनि पर्वतावर क्रॉस चिन्ह : एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील शनि पर्वतावर असलेलं क्रॉस चिन्ह अशुभ मानलं जातं. अशा व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. अशा लोकांची इतरांशी सतत भांडणं होत राहतात.
हातावर काळा डाग : तळहातावरील काळे डाग अशुभ मानले जातात. अशा व्यक्तीला आयुष्यात प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्याला जीवनात सतत संघर्षाला तोंड द्यावं लागतं. व्यवसायात यश मिळत नाही. तळहातावर बृहस्पति पर्वतावर काळा डाग असल्यास व्यक्तीला समाजात किंमत मिळत नाही. वैवाहिक जीवनात अडचणी येत राहतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती हस्तरेषाशास्त्र व विविध मान्यतांवर आधारीत आहे. ही माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं या माहितीच्या आधारे काही करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)
विभाग