Mole on Palm Meaning in Marathi : हस्तरेषा शास्त्रानुसार, हातातील रेषा, तीळ आणि खुणा जीवनातील प्रत्येक पैलूची माहिती देतात. या चिन्हांद्वारे नशीब तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी साथ देईल की नाही हे जाणून घेऊ शकतात. तळहातावर असलेल्या रेषा, तीळ आणि खुणांची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही, परंतु या माहितीच्या माध्यमातून तुम्ही स्वतः तळहात पाहून हे जाणून घेऊ शकता.
शरीराच्या अनेक ठिकाणी तीळ असतात. हस्तरेषाशास्त्रानुसार, शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तीळ असण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. काही लोकांच्या तळहातावर मध्यभागी तीळ असतात. समुद्र शास्त्रामध्ये व्यक्तीच्या तळहातावर असलेल्या तीळांचे सविस्तर वर्णन केले आहे. असे मानले जाते की, तळहातावर काही ठिकाणी तीळ असणे खूप शुभ असते. तळहाताच्या मध्यभागी असलेल्या तीळचा अर्थ आणि तळहातावरील कोणती तीळ शुभ-अशुभ असते ते जाणून घ्या-
समुद्र शास्त्रानुसार तळहाताच्या मध्यभागी तीळ असणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की अशा लोकांचे वैवाहिक जीवन चांगले असते. समुद्र शास्त्रानुसार, तळहाताच्या मध्यभागी असलेला तीळ अनेकदा शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. असे मानले जाते की अशा तीळ असलेल्या लोकांमध्ये नैसर्गिक नेतृत्व कौशल्य असते.
हस्तरेषाशास्त्रानुसार उजव्या तळहाताच्या वरच्या बाजूला तीळ असणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, अशी व्यक्ती श्रीमंत आहे. हस्तरेषा शास्त्रानुसार, डाव्या हाताच्या वरच्या तळहातावर तीळ असणे म्हणजे एखादी व्यक्ती पैसे कमावते, परंतु ते लगेच खर्च करते. पैसा हातात टिकत नाही.
समुद्र शास्त्रानुसार ज्या लोकांच्या अंगठ्यावर तीळ असते ते खूप मेहनती असतात. असे म्हणतात की, अशा लोकांना समाजात मान मिळतो. असे लोक त्यांच्या कामात परिपूर्ण असतात तसेच, असे म्हणतात की ते निर्मळ मनाचे असतात.
हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या लोकांच्या मधल्या बोटावर तीळ असतो त्यांचे जीवन सुखी आणि आनंददायी असते.
समुद्र शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या करंगळीवर तीळ असतो तो भाग्यवान असतो. असे म्हणतात की, असे लोक श्रीमंत असतात पण त्यांना जीवनात दुःखाचा सामना करावा लागतो.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)