मराठी बातम्या  /  धर्म  /  Padmini Ekadashi 2023 : कोणत्या उपायांनी पद्मिनी एकादशीला श्रीविष्णूंना कराल प्रसन्न?

Padmini Ekadashi 2023 : कोणत्या उपायांनी पद्मिनी एकादशीला श्रीविष्णूंना कराल प्रसन्न?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jul 27, 2023 02:32 PM IST

Padmini Ekadashi 2023 : यंदा अधिकमास आल्याने पद्मिनी एकादशीचं व्रत साजरं केलं जाणार आहे. ही एकादशी भगवान श्रीविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. यंदा अधिक मास श्रावणात आल्यानं त्याचं महत्व आणखीनच वाढलं आहे.

कोणत्या उपायांनी कराल विष्णूंना प्रसन्न
कोणत्या उपायांनी कराल विष्णूंना प्रसन्न (HT)

येत्या २९ जुलै २०२३ रोजी पद्मिनी एकदशी साजरी केली जाणार आहे. यंदा अधिकमास आल्याने पद्मिनी एकादशीचं व्रत साजरं केलं जाणार आहे. ही एकादशी भगवान श्रीविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. यंदा अधिक मास श्रावणात आल्यानं त्याचं महत्व आणखीनच वाढलं आहे. पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत आणखीनच महत्वाचं मानलं गेलं आहे. पद्मिनी एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्यास भगवान श्रीविष्णूंचा आपल्यावर आशिर्वाद प्राप्त होतो ते पाहूया.

ट्रेंडिंग न्यूज

पद्मिनी एकादशीला कोणते उपाय केल्याने प्रसन्न होतील भगवान श्रीविष्णू?

तुळशीची पूजा करावी

पद्मिनी एकादशीच्या दिवशी तुळशीपूजेचे विशेष महत्त्व आहे. तुळस ही भगवान श्रीविष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच श्रीविष्णूंना प्रसाद ठेवताना आपण त्यात एक तुळशीचं पान ठेवतो. कमला एकादशीच्या संध्याकाळी तुळशीला दिवा लावा. त्यासोबतच तुळशीच्या भोवती ११ प्रदक्षिणा घालाव्यात. असं केल्याने श्रीविष्णू प्रसन्न होतील आणि आशिर्वाद देतील.

भगवान विष्णूला जल करावं अर्पण

कमला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीविष्णूला जल अर्पण करताना ते जल श्रीविष्णूंना शंखातून अर्पण करा असं केल्याने भगवान श्रीविष्णू प्रसन्न होतील.

दानधर्म करावा

पद्मिनी एकादशीच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. म्हणूनच या दिवशी गरजू आणि गरीब लोकांना कपडे, पैसे, धान्य इत्यादी दान करावे.

गजेंद्र मोक्षाचं करावं पठण

जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पद्मिनी एकादशीच्या दिवशी गजेंद्र मोक्षाचे पठण करावे. हा पाठ केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळेल.

पद्मिनी एकादशीची कथा काय आहे?

कृतवीर्य नावाच्या राजाला अनेक पत्नी होत्या मात्र त्याला पुत्र प्राप्तच होत नव्हता. तेव्हा राजाने तपश्चर्येसाठी जंगलात जाण्याचं ठरवलं. राणी पद्मिनीनेही त्याच्यासोबत जंगलात जाण्याचं ठरवलं. अनुसूयाने राणी पद्मिनीला सांगितले की अधिकमास दर तीन वर्षांनी एकदा येतो. या अधिक मासात शुक्ल पक्षात पद्मिनी एकादशीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होऊन तुला पुत्राचे वरदान देतील.राणीने हे व्रत केलं आणि त्यांना पुत्र प्राप्त झाला.

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग