मराठी बातम्या  /  धर्म  /  Ram Mandir : श्री राम तुमच्या घरीही येणार, २२ जानेवारीला ही ७ शुभ कामे करा; सुख, शांती आणि समृद्धी वाढेल

Ram Mandir : श्री राम तुमच्या घरीही येणार, २२ जानेवारीला ही ७ शुभ कामे करा; सुख, शांती आणि समृद्धी वाढेल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 20, 2024 05:11 PM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी ही शुभ कामे केल्याने तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक आणि भक्तिमय तर होईलच शिवाय तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir (REUTERS)

अनेक वर्षांची प्रतीक्षा आता दोन दिवसांत संपणार आहे. कारण लवकरच अयोध्येत श्री राम विराजमान होणार आहेत. आजपासून दोन दिवसांनी म्हणजेच, २२ जानेवारी दुपारी सनातन धर्माचे स्वप्न पूर्ण होईल आणि अयोध्येत श्री रामांची प्रतिष्ठापणा होईल. 

या खास प्रसंगी तुम्हालाही तुमच्या घरात काही शुभ कामे करायची आहेत. प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी ही शुभ कामे केल्याने तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक आणि भक्तिमय तर होईलच शिवाय तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल. 

२२ जानेवारीला पुढील ही सात शुभ कामे करा

१) खीर अर्पण करा

२२ जानेवारीला सकाळी लवकर उठून आंघोळ करा, घर स्वच्छ करा, स्वयंपाकघरात जा आणि स्वच्छ हातांनी केशराची खीर बनवा. खिरीमध्ये मखाने आणि पंचमावा अवश्य घाला आणि अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपापल्या घरी प्रभू रामाला खीर अर्पण करा आणि आनंद साजरा करताना ही खीर प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना तसेच शेजाऱ्यांना द्या.

२) दिवे लावा

राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यासाठी घरातील देवघरात दिवसभर आणि किमान रात्री १२ वाजेपर्यंत दिवा लावा. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावून पूजा करावी. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तांदळाचे छोटे ढीग ठेवा आणि दिवा लावा. असे केल्याने तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि सुख नांदते.

३) पिवळी फळे दान करा

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या आनंदात गरजू लोकांना पिवळी फळे दान करा आणि या थंडीत गरजूंना उबदार कपडेही दान करा. तुमच्या शुभ कर्माने प्रसन्न होऊन राम तुमच्या घरी नक्कीच येईल.

४) घरात शंखनाद करा

अयोध्येत रामाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण घरामध्ये शंख वाजवा आणि दिवसातून अनेक वेळा शंख फुंकून उत्सव साजरा करा. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता तर दूर होईलच पण तुमच्या घराचे वातावरणही शुद्ध होईल. जर तुमच्या घरात शंख नसेल किंवा तुम्हाला शंख कसा वाजवायचा हे माहित नसेल तर संपूर्ण घरात घंटा वाजवून आनंद साजरा करा आणि सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन करा.

५) मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडावे

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी आपल्या घरी पूजा आणि हवन देखील करावे. पूजा पूर्ण झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडावे आणि त्यासोबत रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि तुमच्या घरात समृद्धी वाढते.

६) घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरवा

प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी घरामध्ये कापूर आणि उदबत्तीचा धूर करावा. असे केल्याने तुमचे घर शुद्ध होते आणि सर्व प्रकारच्या आसुरी शक्तींचा नाश होतो. सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय केल्याने तुम्हाला विशेष फायदा होईल.

७) रामचरित मानसाचे पठण

प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी घरी रामचरित मानसाच्या बालकांडाचे पठण करावे तसेच रामरक्षा स्त्रोत, हनुमान चालीसा व सुंदरकांडचे पठण करावे. असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि दैवी शक्ती जागृत होतील.

WhatsApp channel