मराठी बातम्या  /  धर्म  /  Mauni Amavasya : मौनी अमावस्येला या वस्तूंचे दान करा, पितरांच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ मिळेल

Mauni Amavasya : मौनी अमावस्येला या वस्तूंचे दान करा, पितरांच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ मिळेल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 05, 2024 04:30 PM IST

Mauni Amavasya 2024 Donate These Things : हिंदू धर्मात माघ महिन्यातील मौनी अमावस्येला खूप महत्त्व आहे. या अमावस्येला काही खास गोष्टींचे दान केल्याने जीवनात अनेक फायदे होतात.

Mauni Amavasya Daan
Mauni Amavasya Daan

Mauni Amavasya Daan 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील अमावस्या तिथीला मौनी अमावस्या म्हणतात. माघ महिन्यातील ही अमावस्या अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी स्नान करून दान केल्याने मनुष्याला जीवनात अनेक लाभ होतात. 

मुख्यतः मौनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पितरांची कृपा होते. यासोबतच पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती लाभते. याशिवाय या दिवशी काही वस्तू दान केल्याने पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया मौनी अमावस्येच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे.

मौनी अमावस्येला या वस्तूंचे दान करावे?

मोहरीचे तेल- मौनी अमावस्येच्या दिवशी गरजूंना मोहरीचे तेल दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

ब्लँकेट- मौनी अमावस्येला तुम्ही ब्लँकेट दान करू शकता. ज्योतिष शास्त्रानुसार ब्लँकेट दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. तसेच ब्लँकेट दान केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढील प्रवासात थंडीपासून आराम मिळतो आणि ते सुखी होतात आणि त्यांना समृद्धी प्राप्त होण्याचा आशीर्वाद देतात.

धान्य- मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर ब्राह्मणांना धान्य दान करावे. असे केल्याने पितरांना पुढील प्रवास करताना हे अन्न प्राप्त होते आणि ते सेवन केल्यावर ते तृप्त होतात.

गाईचे दूध- मौनी अमावस्येच्या दिवशी गायीचे दूध दान केल्यास पितरांना तृप्ती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो.

साखर- मौनी अमावस्येच्या दिवशी साखर दान केल्याने पितरांना गोड चव येते आणि ते प्रसन्न होतात.

दक्षिणा - मौनी अमावस्येच्या दिवशी सर्व वस्तूंचे दान करून पितरांना जल अर्पण केल्यावर  ब्राह्मणाला दक्षिणा दान करावी. तरच सर्व दान पूर्ण मानले जाते. असे केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि धनाचा आशीर्वाद देतात.

मौनी अमावस्येला दान केल्याने दुप्पट फायदा होतो

या दान केलेल्या वस्तूंसोबतच मौनी अमावस्येच्या दिवशी अन्न, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू गरजूंना दान केल्याने दुप्पट फायदा होतो. मौनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पितरांची कृपा होते आणि पापांचा नाश होतो, असे शास्त्रात सांगितले आहे. 

त्यामुळेच या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करणाऱ्यांना शुभ फळ मिळते. यामुळे जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि आर्थिक लाभ मिळतो.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel