मराठी बातम्या  /  धर्म  /  Nowruz Wishes : जमशेद नवरोजच्या शुभेच्छा देण्यासाठी या संदेशाचा होईल उपयोग

Nowruz Wishes : जमशेद नवरोजच्या शुभेच्छा देण्यासाठी या संदेशाचा होईल उपयोग

Mar 20, 2024 12:56 PM IST

Nowruz 2024 wishes messages quotes : पारशी नवं वर्ष अर्थात नवरोज २१ मार्च रोजी साजरा केला जात आहे. तीन हजार वर्षांची परंपरा असलेला नवरोज सण अनेक देशात साजरा केला जातो. या नवरोजनिमित्त खास शुभेच्छा द्या.

नवरोजच्या शुभेच्छा
नवरोजच्या शुभेच्छा

Nowruz 2024 wishes messages quotes : नवरोज हा एक शब्द नसून नवरोज हा दोन शब्दांचा एक शब्द बनला आहे. नव म्हणजे नवीन आणि रोज म्हणजे दिवस. म्हणजेच नवरोजचा अर्थ नवा दिवस असा होतो.पारशी समुदायातील लोक दरवर्षी पारशी दिनदर्शिकेतील पहिल्या महिन्याच्या पहिल्या तारखेला नवरोज साजरा करतात.

पारसी लोकांचे स्थलांतर आणि विविध समाजांशी परस्परसंवादाशी संबंधित ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे दोन नवीन वर्ष साजरे केले जातात.

झोरोस्ट्रियन धार्मिक नवीन वर्ष हे "जमशेदी नवरोज" म्हणून ओळखले जाते. हे झोरोस्ट्रियन कॅलेंडरवर आधारित आहे आणि इराणी महिन्याच्या फारवर्डिनच्या पहिल्या दिवशी साजरे केले जाते. तर शहेनशाही नववर्ष नवरोजच्या सहा महिन्यांनंतर, विशेषत: ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या आसपास, विशिष्ट कॅलेंडर गणनेनुसार साजरे केले जाते.

ट्रेंडिंग न्यूज

नवरोजला जमशेदी नवरोज म्हणूनही ओळखले जाते कारण पारसी कॅलेंडरमध्ये सौर गणना सुरू करणाऱ्या महान पर्शियन राजाचे नाव जमशेद होते. नवरोज हा सण गेल्या तीन हजार वर्षांपासून पारशी समाजातील लोकांमध्ये साजरा केला जातो. २१ मार्च २०२४ ला नवरोज असून, यानिमीत्त शुभेच्छा देण्यासाठी हे संदेश उपयोगी येतील.

नवरोजच्या शुभेच्छा

या पारसी नववर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो

जमशेद नवरोजच्या हार्दिक शुभेच्छा

वाईट विचारांना निरोप द्या,

नवीन आशांचा स्वीकार करा

नवरोजच्या हार्दिक शुभेच्छा

येणारे वर्षे तुमच्यासाठी खूप आनंदाची जावो,

पारशी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

आमच्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना

नवरोजच्या खूप खूप शुभेच्छा!

तुमचे हृदय आणि घर आशा,

प्रेम आणि आनंदाने भरू दे.

नवरोजच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या कुटुंबाला शांती, प्रेम आणि समृद्धी लाभो

नवरोजच्या मंगलमय शुभेच्छा

भरपूर प्रेम आणि आनंदाची

तुमच्या आयुष्यात भरभराट होवो

या नवरोज दिनी शुभेच्छा

वसंत ऋतूचा सूर्य तुमच्या जीवनात

आनंद आणि उबदारपणा आणू दे

नवरोजच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

तुम्हाला ३६५ दिवस आनंदाचे,

समृद्धीचे आणि शांतीचे जावो.

पारशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

तुमचे नवीन वर्ष

वसंत ऋतूच्या फुलांसारखे चैतन्यमय जावो.

नवरोज मुबारकच्या शुभेच्छा!

WhatsApp channel