आपल्या हिंदू धर्मात रुढी, परंपरा, चालिरिती, सण-उत्सव यांमध्ये वैविध्य आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही व्रत-वैकल्य, पूजा-पाठ, सण-उत्सव सुरुच असतात. निसर्गाप्रमाणेच आपल्याकडे महिने, ऋतू, सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे.
नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. नोव्हेंबर महिना देखील व्रत-वैकल्य आणि सणांच्या बाबतीत खूप खास असणार आहे. या महिन्यात कार्तिक आणि मार्गशीर्ष हे मराठी महिने असतील. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे भाग्यवान मानले जाते. या महिन्यात दान आणि विधी स्नानाचे विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात स्नान आणि दान केल्याने सर्व पापांची शुद्धी होते असे सांगितले जाते.
तर मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाची आराधना करणे खूप फायदेशीर आहे आणि या महिन्यात एकादशी, द्वादशी आणि पौर्णिमेचे व्रत केल्याने पापांपासून दूर राहणे शक्य आहे. नोव्हेंबर या महिन्यात लक्ष्मीपूजन, भाऊबीजेसह अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण साजरे केले जातील.नोव्हेंबर महिन्यात इतर कोणते व्रत-वैकल आहे जाणून घ्या सर्व सण-उत्सवाची यादी.
शुक्रवार १ नोव्हेंबर - लक्ष्मीपूजन
शनिवार २ नोव्हेंबर - दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा
रविवार ३ नोव्हेंबर - भाऊबीज, यमद्वितीया
मंगळवार ५ नोव्हेंबर - विनायक चतुर्थी
बुधवार ६ नोव्हेंबर - पांडव पंचमी, कड पंचमी, ज्ञानपंचमी
शुक्रवार ८ नोव्हेंबर - जलाराम जयंती
शनिवार ९ नोव्हेंबर - दुर्गाष्टमी, गोपाष्टमी
रविवार १० नोव्हेंबर - कुष्मांड नवमी
मंगळवार १२ नोव्हेंबर - प्रबोधिनी एकादशी, पंढरपूर यात्रा
बुधवार १३ नोव्हेंबर - प्रदोष, चातुर्मास समाप्ती, तुलसीविवाहारंभ
गुरुवार १४ नोव्हेंबर - वैकुंठ चतुर्दशी, बालदिन, पंडित नोहरू जयंती, गोरक्षनाथ प्रकट दिन
शुक्रवार १५ नोव्हेंबर - गुरूनानक जयंती, तुलसिविवाह समाप्ती, त्रिपुरारी पौर्णिमा
सोमवार १८ नोव्हेंबर - संकष्ट चतुर्थी
शनिवार २३ नोव्हेंबर - कालाष्टमी, कालभैरव जयंती
मंगळवार २६ नोव्हेंबर - उत्पत्ती एकादशी
गुरुवार २८ नोव्हेंबर - प्रदोष
शुक्रवार २९ नोव्हेंबर - मासिक शिवरात्री
शनिवार ३० नोव्हेंबर - दर्श अमावस्या
नोव्हेंबर महिन्यात सूर्य आणि शनीसह बुध, गुरू आणि शुक्र हे ग्रहही आपल्या चाली बदलतील. या महिन्याच्या सुरुवातीला ७ नोव्हेंबरला शुक्र धनु राशीत प्रवेश करेल आणि १५ नोव्हेंबर रोजी कुंभ राशीमध्ये शनी मार्गी सुरू करेल. १६ नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. बुध हा बुद्धिमत्तेचा ग्रह २६ नोव्हेंबरपासून वृश्चिक राशीत पूर्वगामी सुरू होईल आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी वृश्चिक राशीत अस्त होईल.