मराठी बातम्या  /  धर्म  /  Amavasya 2024: नववर्षाची पहिली अमावस्या तिथी, जाणून घ्या दर्शवेळा, मुहूर्त, महत्व व मान्यता

Amavasya 2024: नववर्षाची पहिली अमावस्या तिथी, जाणून घ्या दर्शवेळा, मुहूर्त, महत्व व मान्यता

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 09, 2024 06:06 PM IST

Amavasya January 2024 Date and Time: प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात अमावस्या तिथी येते. नवीन वर्षात पहिली अमावस्या कधी आहे आणि त्याचे महत्व काय ते सविस्तर जाणून घ्या.

darsha amavasya
darsha amavasya (Hindustan Times)

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात पौर्णिमा तिथी तर कृष्ण पक्षात अमावस्या तिथी असते, या तिथींचे खास महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणारी नवीनवर्षाची पहिली अमावस्या तिथीचे दर्शवेळा, मुहूर्त, महत्व आणि पूजा पद्धत जाणून घ्या.

अमावस्या शुभ वेळ

मार्गशीर्ष अमावस्या तिथी १० जानेवारी २०२४ रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी प्रारंभ होईल आणि ११ जानेवारी २०२४ रोजी सायं ५ वाजून २६ मिनिटांनी समाप्त होईल. अशात नववर्षाची पहिली अमावस्या ११ जानेवारी रोजी साजरी केली जाईल.

स्नान-दान वेळ - सकाळी ५ वाजून ५७ मिनिटे ते ६ वाजून २१ मिनिटे

अभिजीत मुहूर्त - दुपारी १२ वाजून ८ मिनिटे ते १२ वाजून ५० मिनिटे

गोधुली मुहूर्त - सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटे ते ६ वाजून ७ मिनिटापर्यंत.

प्रत्येक महिन्याच्या नावानुसार व वारानुसार अमावस्या तिथीला संबोधले जाते आणि त्यानुसार महत्व आहे. सोमवारी अमावस्या असल्यास सोमवती अमावस्या, शनिवारी अमावस्या तिथी आल्यास शनैच्छरी अमावस्या म्हणतात. पिठोरी व सर्वपित्री अमावस्येला खास महत्व आहे.

हिंदू पंचांगानुसार आणि खगोलशास्त्रीय स्थितीनुसार, चंद्र पृथ्वीभोवती २८ दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. १५ दिवसांनंतर, चंद्र पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जातो. जेव्हा भारतात चंद्र पूर्णपणे दिसत नाही, त्या दिवसाला अमावस्या म्हणतात. आणि ही घटना (अमावस्या) चंद्राच्या स्थितीनुसार प्रत्येक ठिकाणी किंवा देशासाठी देशातील वेळेनुसार घडते.

अमावस्येला काय करू नये

ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येला कोणतेही नवीन कार्य सुरू करू नये. यादिवशी देणी-घेणीचे व्यवहारही करू नये, असे केल्याने नुकसान होऊ शकते अशी मान्यता आहे. यादिवशी कोणतेच मंगलमय कार्य करू नये, तुळस व बेलपत्र तोडू नये. दुसऱ्यांच्या घरी अन्न ग्रहण करू नये, असे करणे अशुभ असल्याचे सांगितले जाते.

अमावस्येला काय करावे

अमावस्या हा हिंदू धर्मग्रंथांमध्ये पूर्वजांना समर्पित एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी पितरांना दान करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे उत्तम मानले जाते. अमावस्येच्या दिवशी दान-धर्म करणे शुभ मानले जाते. यादिवशी गरीब व गरजूंना अन्नदान करावे. यादिवशी पिंडदान केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतात. तसेच, पितृस्तोत्र व पितृ कवच पठण करावे.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग