Navin Varsha 2025 Shubhechha In Marathi : दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री लोक जुन्या वर्षाला निरोप देतात आणि रात्री १२ वाजता अनेक आशा आणि स्वप्नांसह मोकळ्या हातांनी नवीन वर्षाचे स्वागत करतात. प्रत्येक सरते वर्ष जातांना आपल्याला भरपूर काही शिकवून जातं आणि नवीन वर्ष येतांना आपण त्या शिकवणीतूनच नवीन संकल्प घेऊन नवीन स्वप्नांची शिदोरी बांधतो.
खरे तर येणारे नवीन वर्ष आपल्यासोबत नवीन आनंद, नवीन स्वप्ने आणि भरपूर उत्साह घेऊन येत असतं, त्यामुळे जगभरातील लोक नवीन वर्षाचे वेग-वेगळ्या हटके पद्धतीने स्वागत करताना दिसतात. २०२४ हे वर्ष सरत चाललं आहे आणि २०२५ अवघ्या दोन दिवसांत दार ठोठावेल. मागील वर्षीचे हिशेब मागे राहिले आहेत, त्याची जागा नवीन वर्षाच्या संकल्पांनी घेतली आहे. तर तुमचे प्रियजण शुभेच्छा पाठवतील त्या आधी तुम्हीच मोबाईल उचला आणि हे खास शुभेच्छा पाठवून नवीन वर्षाचा आनंद साजरा करा.
नववर्षाभिनंदन!
२०२५ हे येणारे नववर्ष
आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
…
सरत्या वर्षाला निरोप देत,
नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच करूया स्वागत.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
…
नव्या या वर्षी
संस्कृती आपली जपू या
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या
नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
…
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन
वाईट वजा करूया
नवे संकल्प, नवे स्वप्न रंगवूया
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
…
गेलेल्या दिवसासोबत
आपणही विसरुया सारे हेवेदावे,
नव्या वर्षाच्या उत्साहात
करुया नवी सुरुवात.
नववर्षाभिनंदन!
…
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
…
तुमचे दिवस हास्याने आणि
तुमचे हृदय अनंत आनंदाने भरले जावो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया आणि
जुन्या स्वप्नांना नव्या स्वप्नांची जोड देऊन ते फुलुवुया
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.