Good Morning Marathi Message: प्रत्येक दिवस नवी पहाट आणि नवा उत्साह घेऊन येतो. गेल्या दिवसांची धडपड आणि येणारे दिवस महत्त्वाचे धडे देतात. अशा वेळी मनातील नकारात्मक विचार काढून टाकून सकारात्मक उर्जेने भरून दिवस आनंदात घालवण्यासाठी चांगले विचार आवश्यक आहेत. आम्ही तुमच्यासाठी असे काही विचार घेऊन आलो आहोत जे वाचल्यानंतर तुमचे मन नवीन उर्जेने भरेल. शिवाय हे विचार तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवून त्यांचा दिवस सकारात्मक बनवू शकता. त्यामुळेच सोशल मीडियासाठी तुम्ही नवनवीन सुंदर मेसेज शोधत असाल, तर इथे तुम्हाला एकापेक्षा एक सकारात्मक मेसेज मिळतील. चला पाहूया...
यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही माणसे
आयुष्यभर लक्षात राहतात..
शुभ सकाळ !
मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
कारण खूप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात..
सुप्रभात!
नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच
उसने मिळत नाही…
ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते.
सुप्रभात!
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो.
गुड मॉर्निंग|
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
गुड मॉर्निंग!
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ!
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच..
शुभ सकाळ!
चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही.
शुभ सकाळ!