मराठी बातम्या  /  धर्म  /  Lord Shiva : शंकराला हळद,कुंकू, तुळस का अर्पण केलं जात नाही? जाणून घ्या कारण

Lord Shiva : शंकराला हळद,कुंकू, तुळस का अर्पण केलं जात नाही? जाणून घ्या कारण

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jan 23, 2023 03:03 PM IST

Never Offer These Things To Lord Shiva : भोलेनाथांना काही गोष्टींपासून वर्ज्य ठेवण्यात आलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण पाहूया शंकराला कोणत्या गोष्टी अर्पण करु नये.

भगवान शिवशंकर
भगवान शिवशंकर (हिंदुस्तान टाइम्स)

हिंद धर्मात देवी देवतांवर अनेक गोष्टीं भाविक अर्पण करत असातात. गणपतीला दुर्वा,विष्णूंना तुळस शंकराला बेलपत्र आणि आणखी बरंच काही. कोणत्या देवाला कोणता नैवेद्य प्रिय आहे याबाबतही हिंदू धर्मशास्त्रात माहिती सांगितली गेली आहे. त्याचसोबत कोणत्या देवाला कोणत्या गोष्टी अर्पण करु नयेत याचीही शास्त्रीयदृष्ट्या माहिती दिली गेली आहे. भगवान शिवशंकराला भोलेनाथ म्हणूनही ओळखलं जातं. मात्र या भोलेनाथांना काही गोष्टींपासून वर्ज्य ठेवण्यात आलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण पाहूया शंकराला कोणत्या गोष्टी अर्पण करु नये आणि त्यामागचं काय आहे कारण.

तुळस

तुळशीच्या पानांचा वापर जवळपास प्रत्येक पूजेत केला जातो, परंतु भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये. मान्यतेनुसार भगवान शिवाने तुलसीचा पती असुर जालंधर याचा वध केला होता. म्हणूनच तुळशीला भगवान शंकराचा राग आला आणि त्याने त्याला अलौकिक आणि दैवी गुण असलेल्या पानांपासून वंचित केले.

कुंकू

भारतीय धर्म आणि संस्कृतीमध्ये कुंकू हा विवाहित महिलांसाठी दागिना मानला गेला आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्याच्या मागणीसाठी कुंकू लावतात आणि देवालाही अर्पण करतात, परंतु भगवान शिवाला कुंकू अर्पण करू नये. कारण भगवान शिवाला वैरागी मानले जाते, म्हणूनच शिवाला कुंकू अर्पण केलं जात नाही.

हळद

पुराणानुसार भगवान शिवाच्या पूजेमध्ये महागड्या साहित्याचा वापर करण्यास मनाई आहे. हळद देखील या महागड्या पदार्थांपैकी एक आहे, मान्यतेनुसार, भगवान शंकराच्या पूजेमध्ये हळदीचा वापर केल्याने त्याचा राग शांत होत नाही. हळदीचा प्रभाव उष्ण असतो, हळद शिवलिंगावर वापरल्याने उष्णता वाढते. म्हणूनच शिवपूजेत हळदीचा वापर केला जात नाही. हळदीचा संबंध महिलांच्या सौंदर्यासाठी बनवलेल्या गोष्टी आहे. याच कारणामुळे भगवान शंकराला हळद आवडत नाही.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

विभाग