गणेशोत्सवानंतर पितृपंधरवडा आणि यानंतर येणारा नवरात्रोत्सवाला आपल्या हिंदू धर्मात फार महत्व आहे. ३ ऑक्टोबरला घटस्थापना होईल आणि नवरात्राला सुरवात होईल. नवरात्रात देवीची पूजा, होम-हवन आणि गरबा-दांडीया खेळून हे नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
नवरात्री हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये शक्ती/देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहावा दिवस दसरा म्हणून प्रसिद्ध आहे. नवरात्र वर्षातून चार वेळा येते. माघ, चैत्र, आषाढ आणि आश्विन महिन्यात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. यंदा नवरात्रीत देवी पालखीत विराजमान होऊन येईल. चला नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन हा आनंदोत्सव द्विगुणीत करूया.
या देवी सर्वभूतेषु
शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
…
सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी,
नारायणी नमोस्तुते…
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या
हार्दिक शुभेच्छा…
…
घटस्थापना घटाची,
नवदुर्गा स्थापनेची..
आतुरता आगमनाची,
आली पहाट नवरात्र उत्सवाची..
नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा
…
ज्या क्षणाची पाहत होतो वाट
तो आज आला आहे
होऊन पालखीत स्वार
देवी आली आहे
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
…
घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नऊ रात्रीला
करूया देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
…
देवीची नऊ रुपे पहावी
शक्ती बुद्धी तुम्हा लाभावी
अन्नपूर्णेची कृपया होवो
आई भवानीचा तुम्हा आशीर्वाद लाभो
नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
…
नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
…
नवरात्रीचे नऊ दिवस,
सण हा मांगल्याचा असे..
देवीची नऊ रूपे पाहून,
मन तिच्याच ठायी वसे.
नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा
…
अम्बा मातेचे नऊ रूप तुम्हाला कीर्ति,प्रसिद्धी,
आरोग्य, धन, शिक्षण, सुख,
समृद्धी,भक्ति आणि शक्ति देवो.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
…
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
…
N-नव रूपाची
A-आरती
V-वंदना
R-रक्षा
A-आराधना
T-तेज
R-राखनारी
A-अम्बा माता तुमच्या इच्छा पूर्ण करो.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
…
आंबा मताचे नऊ रूप तुम्हाला
कीर्ती , प्रसिद्धी , आरोग्य ,
धन , शिक्षण ,
सुख , समृद्धी ,
भक्ती आणि शक्ती देवो .
जय आंबा माता
हॅपी नवरात्री 2024
…
नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,
नमितो आम्ही तुजला.
शुभ नवरात्री!