Navratri Saraswati Pujan Wishes : सरस्वती पूजनानिमित्त प्रियजणांना पाठवा हे खास शुभेच्छा संदेश
मराठी बातम्या  /  धर्म  /  Navratri Saraswati Pujan Wishes : सरस्वती पूजनानिमित्त प्रियजणांना पाठवा हे खास शुभेच्छा संदेश

Navratri Saraswati Pujan Wishes : सरस्वती पूजनानिमित्त प्रियजणांना पाठवा हे खास शुभेच्छा संदेश

Oct 09, 2024 12:20 PM IST

Saraswati Pujan 2024 Wishes : नवरात्रीच्या सातव्या दिवशी सरस्वती देवीचे आवाहन केले जाते. तसेच दुसऱ्या दिवशी सरस्वती देवीचे पूजन केले जाते. सरस्वती पूजनानिमित्त प्रियजणांना पाठवा हे खास शुभेच्छा संदेश.

नवरात्रीतील सरस्वती पूजन २०२४ शुभेच्छा
नवरात्रीतील सरस्वती पूजन २०२४ शुभेच्छा

नवरात्र वर्षातून चार वेळा येते. माघ, चैत्र, आषाढ आणि आश्विन महिन्यात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ रात्रींमध्ये, महालक्ष्मी, महासरस्वती किंवा सरस्वती आणि महाकाली या तीन देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

नवरात्रीच्या काळात सरस्वती पूजनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या चार दिवसीय उत्सवाचा पहिला दिवस सरस्वती आवाहन, दुसरा दिवस सरस्वती पूजा, तिसरा दिवस सरस्वती अभिषेक आणि चौथा दिवस सरस्वती विसर्जन म्हणून ओळखला जातो.

नवरात्रीच्या सातव्या दिवशी सरस्वती देवीचे आवाहन केले जाते. तसेच दुसऱ्या दिवशी सरस्वती देवीचे पूजन केले जाते. या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी सरस्वती आवाहन असून, १० ऑक्टोबर रोजी सरस्वती देवीचे पूजन केले जाईल. सरस्वती पूजनानिमित्त प्रियजणांना पाठवा हे खास शुभेच्छा संदेश.

सरस्वती पूजनाच्या शुभेच्छा

या कुन्देन्दु-तुषारहार-धवला या शुभ्र-वस्त्रावृता

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।

या ब्रह्माच्युत-शङ्कर-प्रभृतिभिर्देवैः सदा पूजिता

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा

सरस्वती पूजनाच्या शुभेच्छा

शारदा शारदांभौजवदना, वदनाम्बुजे।

सर्वदा सर्वदास्माकमं सन्निधिमं सन्निधिमं क्रियात्।म

सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्ञान आणि कलेच्या देवीचे आवाहन भक्तिभावाने करूया

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

सरस्वती पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!

सरस्वती माता तुमच्या जीवनात

ज्ञान, किरण, संगीत,

सुख-शांति, समृद्धि, धन-संपत्ति,

आणि प्रसन्नता आणेल.

सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचे घर आणि अंगण सुगंधित राहो...

तुमची सर्व कामे अडथळे न येता पूर्ण होवोत...

तुम्हाला कोणाचाही त्रास न होवो...

सरस्वती देवीच्या मंत्रांनी तुमचे तन-मन गुंजत राहो

सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

सरस्वती देवी तुमच्यावर

दैवी आशीर्वादाचा वर्षाव करो आणि

तुम्हाला यश आणि ज्ञानाच्या मार्गावर

मार्गदर्शन करो.

सरस्वती पूजनाच्या शुभेच्छा.

सर्व शिक्षणाचे दिवे लावू,

निरक्षरांना शिक्षित करूया,

समतेचे समर्थन करूया,

झोपलेल्यांना जागे करूया.

सरस्वती पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुमच्या आत ज्ञानाचा झरा फुलू दे

ज्ञान आणि यशासाठी आशीर्वाद मिळू दे

तुमचे स्वप्न आणि इच्छा पूर्ण होऊ दे

सरस्वती पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा

ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे

ज्ञान हीच शक्ती आहे

ज्ञान हीच भक्ती आहे

ज्ञान हाच यशाचा मार्ग आहे

सरस्वती पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा

Whats_app_banner