Saraswati Pujan : आज सरस्वती पूजन; जाणून घ्या पूजा विधी, मंत्र, महत्व आणि मान्यता
मराठी बातम्या  /  धर्म  /  Saraswati Pujan : आज सरस्वती पूजन; जाणून घ्या पूजा विधी, मंत्र, महत्व आणि मान्यता

Saraswati Pujan : आज सरस्वती पूजन; जाणून घ्या पूजा विधी, मंत्र, महत्व आणि मान्यता

Oct 10, 2024 09:34 AM IST

Navratri Saraswati Pujan 2024 : सरस्वतीपूजन खऱ्या अर्थाने षष्ठी पासून सुरू होऊन दसऱ्यापर्यंत असते. आश्विन शुक्ल सप्तमीला अर्थात आज १० ऑक्टोबर रोजी सरस्वती देवीचे पूजन केले जाईल. जाणून घ्या सरस्वती पूजन कसे करतात.

नवरात्रीत सरस्वती पूजन कसे करतात
नवरात्रीत सरस्वती पूजन कसे करतात

नवरात्रीत सरस्वती पूजनला वेगळे महत्व आहे. सरस्वतीपूजन खऱ्या अर्थाने षष्ठी पासून सुरू होऊन दसऱ्यापर्यंत असते. आश्विन शुक्ल षष्ठीला म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी सरस्वती देवीचे आवाहन केले गेले आहे. आश्विन शुक्ल सप्तमीला अर्थात आज १० ऑक्टोबर रोजी सरस्वती देवीचे पूजन केले जाईल.

सरस्वती पूजनाचा मुहूर्त

नवरात्रीत बुधवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:२५ ते दुपारी ४:४२ पर्यंत सरस्वती आवाहन पूजनाचा मुहूर्त असेल. मूळ नक्षत्र ९ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ४:८ वाजता सुरू होईल आणि १० ऑक्टोबर रोजी पहाटे ५:१५ वाजता समाप्त होईल.

सरस्वती पूजा मुहूर्त १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११:२२ ते ५:२८ पर्यंत असेल. पूर्वाषाढा नक्षत्र १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ५:१५ वाजता सुरू होईल आणि ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ५:४१ वाजता समाप्त होईल.

११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३७ ते सायंकाळी ५:३३ पर्यंत सरस्वती वैद्य पूजेची वेळ असेल. उत्तराषाढा नक्षत्र ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ५:४१ वाजता सुरू होईल आणि १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ५:२५ वाजता समाप्त होईल.

सरस्वती विसर्जनाची वेळ १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:२० ते ११:११ अशी असेल. श्रवण नक्षत्र १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ५:२५ वाजता सुरू होईल आणि १३ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ४:२७ वाजता समाप्त होईल.

सरस्वती पूजन कसे करतात

या दिवशी सरस्वती देवीच्या फोटोची किंवा मूर्तीची, ग्रथांची आणि लेखणीची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर तीन दिवस सप्तमी, अष्टमी, नवमीपर्यंत ग्रंथवाचन, अध्ययन, अध्यापन आणि लेखन हे व्यवहार बंद ठेवावेत. असे म्हणतात की, या काळात सरस्वती देवी शयन करते. दशमीला म्हणजेच दसऱ्याला पुन्हा पाटीवर सरस्वती काढावी आणि सरस्वतीची, ग्रंथांची, लेखण्यांची पूजा करावी. अशी आराधना केल्यास सरस्वती देवी आपल्या भक्तांवर प्रसन्न होते आणि अधिक बुद्धि प्रदान करते अशी मान्यता आहे.

सरस्वती पूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर पूजेच्या ठिकाणी देवी सरस्वतीचे चित्र स्थापित करा. यानंतर ताटात फुले, अक्षत, चंदन आणि कुंकुम ठेवा. त्यानंतर विधीप्रमाणे देवी सरस्वतीची पूजा करावी. यानंतर मातेच्या मंत्रांचा जप करावा. यानंतर देवी सरस्वतीला फुले व अक्षत अर्पण करावे. शेवटी माता सरस्वतीची आरती करावी. पूजेच्या शेवटी सर्वांना प्रसाद वाटप करा.

सरस्वती बीज मंत्र

ओम ऐं ह्रीं क्लीं महासरस्वती देव्यै नमः।

सरस्वती ॐ सरस्वत्यै नमः।

महामाया ॐ महमायायै नमः।

श्रीप्रदा ॐ श्रीप्रदायै नमः।

ज्ञानमुद्रा ॐ ज्ञानमुद्रायै नमः।

पद्माक्षी ॐ पद्मा क्ष्रैय नमः।

Whats_app_banner