Navratri Kanya Pujan : नवरात्रीत कन्या पूजन कधी करतात? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्व
मराठी बातम्या  /  धर्म  /  Navratri Kanya Pujan : नवरात्रीत कन्या पूजन कधी करतात? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्व

Navratri Kanya Pujan : नवरात्रीत कन्या पूजन कधी करतात? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्व

Oct 04, 2024 08:10 PM IST

Kanya Pujan 2024 : नवरात्रीच्या ९ दिवसांत दुर्गादेवीच्या उपासनेसोबतच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ९ मुलींना भोजनासाठी आमंत्रित करून कन्यापूजा केली जाते. जाणून घ्या कन्या पूजन कधी आहे आणि पूजनाचा विधी.

कन्या पूजन २०२४
कन्या पूजन २०२४

Shardiya Navratri 2024 Kanya Pujan : शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होते आणि नवमी तिथीला समाप्त होते. या वर्षी ३ ते १२ ऑक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सव आहे. 

नवरात्रीत कन्या पूजनाला खास महत्व आहे. तर कन्यापूजा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केली जाते. नवदुर्गांच्या पूजेबरोबरच नवरात्रीच्या ९ दिवसांत कन्यापूजेलाही विशेष महत्त्व आहे. मुलीची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते, अशी धार्मिक धारणा आहे. यावर्षी महाअष्टमी आणि महानवमी तिथीचा क्षय झाला असून ११ ऑक्टोंबर रोजीच अष्टमी आणि नवमी तिथीचा उपवास आहे. तर १२ ऑक्टोंबरला नवरात्रोत्थापन आणि दसरा साजरा करण्यात येईल. ११ ऑक्टोबरला कन्या पूजन करू शकतात.

कन्यापूजेसाठी ९ मुली बोलावण्याची परंपरा आहे. मुलींना दुर्गा मातेच्या ९ रूपांचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, जेव्हा विधीनुसार कन्या पूजा केली जाते तेव्हा देवी माता तीच्या भक्तांना विशेष आशीर्वाद देते. घरात सुख-समृद्धी, संपत्ती नांदते. नवरात्रीत कन्या पूजेची पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया...

कन्या पूजा करण्याची पद्धत:

अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा.

यानंतर अष्टमी किंवा नवमी तिथीला पूजेच्या वेळी कन्येची पूजा करण्याची संकल्पना करा.

कन्यापूजेसाठी हरभरा, पुरी, हलवा, खीर इत्यादींचा प्रसाद तयार करून माता राणीला अर्पण करावा.

घरात मुली आल्यावर सर्व प्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत.

यानंतर मुलींना आसनावर बसवून हलवा, पुरी आणि हरभराची भाजी असा केलेला संपूर्ण नैवेद्य खायला द्या.

मुलींनी जेवण संपवल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा.

यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करावा. नमस्कार करावा.

त्यांना क्षमतेनुसार फळे, वस्त्रे आणि दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घ्या.

कन्या पूजा का महत्त्वाची आहे?

नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करणे विशेष शुभ मानले जाते. यासोबतच नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला मुलींची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. कन्या पूजेमध्ये २ ते १० वर्षे वयोगटातील मुलींना घरी बोलावून कन्यापूजा केली जाते. माता राणीची भक्तिभावाने पूजा करून कन्या पूजा केल्याने माता आपल्या भक्तांवर सदैव कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner