Navratri : उद्या महाअष्टमी आणि महानवमी; प्रियजणांना हे शुभेच्छा पाठवा आणि दिवस गोड करा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Navratri : उद्या महाअष्टमी आणि महानवमी; प्रियजणांना हे शुभेच्छा पाठवा आणि दिवस गोड करा

Navratri : उद्या महाअष्टमी आणि महानवमी; प्रियजणांना हे शुभेच्छा पाठवा आणि दिवस गोड करा

Oct 10, 2024 02:37 PM IST

Navratri Ashtami And Navami Shubhechha 2024 : नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या खास दिवशी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देखील पाठवतात. तुम्ही या खास संदेशांसह तुमच्या प्रियजनांना अष्टमी आणि नवमीच्या हार्दिक शुभेच्छाही पाठवू शकता-

नवरात्री अष्टमी आणि नवमी २०२४ शुभेच्छा
नवरात्री अष्टमी आणि नवमी २०२४ शुभेच्छा

Navratri Ashtami And Navami Wishes in Marathi : नवरात्रीचा सण आता संपण्यावर आला आहे. यावर्षी नवरात्रीची अष्टमी आणि नवमी तिथी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी एकाच दिवशी आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, सप्तमी आणि अष्टमी तिथी १० ऑक्टोबर रोजी आहे. परंतु हिंदू धर्मात सप्तमीसह अष्टमी व्रत पाळण्यास मनाई आहे. त्यामुळे ११ ऑक्टोबर रोजी अष्टमी व्रत पाळण्यात येणार असून, याच दिवशी नवमीही साजरी केली जाणार आहे. माता महागौरीची पूजा करण्यासोबतच नवरात्रीच्या अष्टमी तिथीला कन्या पूजन करण्याचीही परंपरा आहे. तर नवमीला नवरात्री समाप्त होते. नवरात्रीच्या नवव्या दिवशी दुर्गेचे नववे रूप सिद्धिदात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. नवमी तिथीलाही कन्या पूजन आणि हवन केले जाते. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना भक्तीपूर्ण संदेशासह शुभेच्छा पाठवू शकता. 

नवरात्री अष्टमीच्या शुभेच्छा

नारी तू नारायणी, 

नारी तू सबला 

तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, 

नमितो आम्ही तुजला

नवरात्री अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व मंगल मांगल्ये, 

शिवे सर्वार्थ साधिके, 

शरण्ये त्र्यम्बके गौरी, 

नारायणी नमोस्तुते… 

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या 

महाअष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

शक्तीची देवी तुम्हाला यशाच्या मार्गावर मार्गदर्शन करेल

आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

हॅपी नवरात्र अष्टमी

महागौरी देवीच्या आशीर्वादाने 

तुमचे जीवन आनंद, शांती आणि भरभराटीचे जावो.

नवरात्र अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

महागौरी देवीच्या उपासनेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होवोत

आणि तिची कृपा तुम्हाला शाश्वत सुख आणि समाधान मिळवून देवो

महाअष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा

नवरात्री नवमीच्या शुभेच्छा

शक्ती अंगी येते आई नाव तुझे घेता 

चैतन्य अंगी येते रूप तुझे पाहता 

संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता 

सर्वांना नवरात्री नवमीच्या खूप खूप शुभेच्छा!

देवी सिद्धिदात्रीच्या उपासनेने 

तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश येवो.

नवरात्री नवमीच्या खूप खूप शुभेच्छा!

नवरात्रीचे नऊ दिवस, 

सण हा मांगल्याचा असे.. 

देवीची नऊ रूपे पाहून, 

मन तिच्याच ठायी वसे..

हॅपी नवमी २०२४

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। 

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ 

नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!ॉ

नवदुर्गेची कृपा तुमच्यावर सदैव राहो,

तुमचे जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती येवो.

नवरात्र नवमीच्या मंगलमय शुभेच्छा

 

Whats_app_banner