Shardiya Navratri 2024 : नवरात्रीला सुरुवात होणार आहे. ३ ऑक्टोबरला घटस्थापनेने नवरात्रारंभ होत आहे. नवरात्रीचे ९ दिवस दुर्गा मातेला समर्पित आहेत. यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा पालखीवर बसून येत आहे.
मान्यतेनुसार, गुरुवार किंवा शुक्रवारपासून जेव्हाही नवरात्र सुरू होते, तेव्हा माता पालखीत किंवा डोलीत येत असल्याचे मानले जाते. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांच्या पूजेला खूप महत्त्व आहे. जाणून घेऊया कोणत्या दिवशी दुर्गेच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाईल.
यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात आश्विन महिन्यातील प्रतिपदा तिथी, ३ ऑक्टोबर गुरुवारपासून होत आहे. प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:१८ वाजता सुरू होत आहे आणि ४ ऑक्टोबर रोजी पहाटे २:५८ पर्यंत राहील.
३ ऑक्टोबर २०२४ - शैलपुत्री देवीची पूजा
४ ऑक्टोबर २०२४ - ब्रह्मचारिणी देवीची पूजा
५ ऑक्टोबर २०२४ - चंद्रघंटा देवीची पूजा
६ ऑक्टोबर २०२४ - कूष्मांडा देवीची पूजा
७ ऑक्टोबर २०२४ - स्कंदमाता देवीची पूजा
८ ऑक्टोबर २०२४ - कात्यायनी देवीची पूजा
९ ऑक्टोबर २०२४ - कालरात्रि देवीची पूजा
१० ऑक्टोबर २०२४ - महागौरी देवीची पूजा
११ ऑक्टोबर २०२४ - सिद्धिदात्री देवीची पूजा
दुर्गा देवींनी महिषासुराशी ९ दिवस युद्ध केल्यानंतर १० व्या दिवशी माता दुर्गाने त्याचा वध केला. माता कात्यायिनी दुर्गाने महिषासुराचा वध केल्यामुळे तेव्हापासून नवरात्र आणि विजयादशमी हा सण साजरा केला जातो असे सांगितले जाते.
भगवान ब्रह्मदेवाने भगवान श्रीराम यांना दुर्गा देवीचे रूप असलेल्या चंडीदेवीची पूजा करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या सांगण्यावरूनच प्रतिपदा पासून नवमी तिथीपर्यंत चंडी देवीची पूजा श्रीरामाने केली होती. भगवान श्रीरामाने ९ दिवस अन्न आणि पाणी घेतले नाही. श्रीरामाने ९ दिवस दुर्गा मातेचे रूप असलेल्या चंडीदेवीची पूजा केल्यानंतर श्रीरामाने रावणावर विजय मिळवला. तेव्हा पासून नवरात्रोस्तव आणि ९ दिवस उपवास सुरु झाल्याचे मानले जाते.
पंचांगानुसार घटस्थापना मुहूर्त - सकाळी ६:१५ ते सकाळी ७:२२ गुरुवार, ३ ऑक्टोबर २०२४
कालावधी - १ तास ६ मिनिटे
पंचांगानुसार घटस्थापना अभिजित मुहूर्त - सकाळी ११:४६ ते दुपारी १२:३३
कालावधी – ०० तास ४७ मिनिटे