Navratri : घटस्थापना कधी आहे? जाणून घ्या तिथी, तारीख, पूजेचा मुहूर्त आणि पूजा विधी-navratri 2024 date time in marathi ghatasthapana shubh muhurta and puja vidhi ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Navratri : घटस्थापना कधी आहे? जाणून घ्या तिथी, तारीख, पूजेचा मुहूर्त आणि पूजा विधी

Navratri : घटस्थापना कधी आहे? जाणून घ्या तिथी, तारीख, पूजेचा मुहूर्त आणि पूजा विधी

Sep 26, 2024 11:16 AM IST

Navratri 2024 Date and Time : पितृ पक्षानंतर नवरात्रोत्सवाला सुरवात होईल. नवरात्रीच्या काळात अनेक भक्त विधींसह घटस्थापना करून ९ दिवस उपवास करतात. नवरात्रीचा पहिला दिवस कधी आहे? तसेच, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊया.

नवरात्री घटस्थापना २०२४
नवरात्री घटस्थापना २०२४

Navratri 2024 Date Time : हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते. पुष्कळ भाविक विधींसह कलश स्थापना, घटस्थापना करून ९ दिवस उपवास करतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा आणि कन्यापूजा करून व्रताची सांगता केली जाते. नवरात्रीचा पहिला दिवस कधी आहे आणि घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया-

नवरात्रीचा पहिला दिवस कधी आहे

हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याची शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी २ ऑक्टोबर २०२४ रोजी अर्धरात्रौ १२ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी समाप्त होईल. अशा परिस्थितीत उदया तिथीनुसार ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या वर्षी देवीचे वाहन पालखी आहे.

कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त आणि घटस्थापना : 

गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी, अश्विन शुक्ल प्रतिपदा, शारदीय नवरात्री सुरू होत आहे. सकाळी ६ वाजून ७ मिनिटे ते ९ वाजून ३० मिनिटापर्यंत कलश स्थापनेचा, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर ११ वाजून ३७ मिनिटे ते १२ वाजून २३ मिनिटापर्यंत अभिजीत मुहूर्त अतिशय शुभ राहील. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल.

घटस्थापना पूजा पद्धत

शुभ मुहूर्तावर कलशाची प्रतिष्ठापना केल्याने साधकाच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. जर तुम्ही कलश स्थापना करत असाल तर घटस्थापना चांदी, माती किंवा तांब्याच्या कलशात करू शकता. घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलचे भांडे वापरू नका. घटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता करावी.

आता गंगाजल शिंपडून घटस्थापना स्थान शुद्ध करा. यानंतर हळदीपासून अष्टदल बनवून कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात लवंग, अक्षत, हळद, नाणी, वेलची, सुपारीची पाने व फुले टाकावीत. यानंतर कुंकवाने स्वस्तिक बनवा. शेवटी, कलश स्थापित करताना, देवी दुर्गा चे नामस्मरण करा.

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाईल, 

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापित केल्यानंतर शैलपुत्री मातेचे ध्यान केले जाते.

देवीची पूजा विधी

स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी. दुर्गा मातेचा जलाभिषेक करावा, पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक करा. आता देवीला लाल चंदन, सिंदूर, सौभाग्याच्या वस्तू आणि लाल फुले अर्पण करा. मंदिरात तुपाचा दिवा लावावा. दुर्गा देवीची आरती पूर्ण भक्तिभावाने करा. देवीला नैवेद्य अर्पण करा. शेवटी क्षमा प्रार्थना करा.

 

 

Whats_app_banner
विभाग