Navratri Third Day : तृतीय स्वरूप चंद्रघंटा देवी, जाणून घ्या पूजेची वेळ, पूजाविधी, मंत्र आणि शुभ रंग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Navratri Third Day : तृतीय स्वरूप चंद्रघंटा देवी, जाणून घ्या पूजेची वेळ, पूजाविधी, मंत्र आणि शुभ रंग

Navratri Third Day : तृतीय स्वरूप चंद्रघंटा देवी, जाणून घ्या पूजेची वेळ, पूजाविधी, मंत्र आणि शुभ रंग

Oct 04, 2024 08:40 PM IST

Navratri 2024 Third Day - उद्या नवरात्रीचा तीसरा दिवस आहे. नवरात्रीच्या तीसऱ्या माळेला देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते, पूजा पद्धत, देवीचा मंत्र आणि या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे ते जाणून घ्या.

नवरात्रीचा तीसरा दिवस, तीसरी माळ
नवरात्रीचा तीसरा दिवस, तीसरी माळ

Navratri 3rd Day Chandraghanta Devi : सध्या शारदीय नवरात्रीचा पवित्र सण सुरू आहे.नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या ९ दिवसाच वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. ९ दिवसाचे ९ नैवेद्य दाखवले जातात. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला खास महत्व आहे. जाणून घ्या नवरात्रीचा तीसरा दिवस कधी आहे, या दिवसाला देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते, पूजा पद्धत आणि या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रातील तिसरा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. नवदुर्गेतील चंद्रघंटा देवी दुर्गा देवीचे तिसरे स्वरुप मानले जाते. नवरात्रात तिसऱ्या दिवसाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचे सागितले जाते.

शनिवार ५ ऑक्टोबर हा नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेच्या तिसऱ्या रूपाची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरुप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे.

चंद्रघंटा देवीचे स्वरूप

माता चंद्रघंटाच्या कपाळावर घड्याळाच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, त्यामुळे भक्त आईला चंद्रघंटा देवी म्हणतात. असे मानले जाते की, मातेने आपल्या भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी हातात त्रिशूळ, तलवार आणि गदा धारण केली आहे.धार्मिक मान्यतांनुसार, चंद्रघंटा माता राक्षसांचा वध करणारी आहे असे म्हटले जाते. भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, असे सांगितले जाते.

चंद्रघंटा देवीची पूजा पद्धत...

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीचे तिसरे रूप असलेल्या चंद्रघंटा देवीची पूजा विधीनुसार करावी. ॐ देवी चंद्रघंटाय नमः या जपाने मातेची पूजा केली जाते. चंद्रघंटा मातेला सिंदूर, अक्षत, अगरबत्ती, धूप आणि फुले अर्पण करा. तुम्ही तुमच्या देवीला दुधापासून बनवलेली मिठाई देखील देऊ शकता. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी नित्यक्रमानुसार दुर्गासप्तषतीचे पठण करावे आणि देवीची आरती करावी तसेच नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करावा.

चंद्रघंटा देवीचा मंत्र

पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।

प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥

या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:।।

शारदीय नवरात्रीचा तीसरा दिवस आजचा रंग

शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा शुभ रंग राखाडी आहे. नवरात्रीचा रंग आठवड्यातील त्या दिवसाच्या आधारे निवडला जातो ज्यामुळे सणाची सुरुवात होते.

 

Whats_app_banner