Narak Chaturdashi 2024: जर तुम्हाला धनाबाबत काही समस्या असतील आणि पैसा कमावण्यासाठी संघर्ष करत असाल तर, नरक चतुर्दशीच्या दिनी पूजापाठ करण्याबरोबरच काही उपाय जरूर करा. असे केल्याने तुमची पैशांची तंगी दूर होईल अशी मान्यता आहे.
Narak Chaturdashi: कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी म्हणतात. वैदिक पंचांगानुसार, यावर्षी नरक चतुर्दशी बुधवार, ३० ऑक्टोबर २०२४ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी यमाचा दिवा लावला जातो, असे म्हणतात की यामुळे अकाली मृत्यूची भीती दूर होते. नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी. या दिवाळीशी संबंधित पौराणिक कथेनुसार, या दिवशी श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी नरकासुराचा वध करून सुमारे १६ हजार स्त्रियांना त्याच्या बंदिवासातून मुक्त केले. तेव्हापासून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी काही उपाय केल्यास धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
छोट्या दिवाळीच्या दिवशी म्हणजेच नरक चथुर्दशीच्या दिवशी चंदनाची पेस्ट लावावी आणि त्यानंतर तीळ आणि तेलाने स्नान करावे, अशी मान्यता आहे. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायला विसरू नका.
छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी उठून उटणे लावावे आणि नंतर आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकून स्नान करावे. असे केल्याने तुम्ही सुंदर आणि निरोगी बनाल. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.
नरक चतुर्दशी म्हणजेच छोट्या दिवाळीच्या दिवशी हनुमान जयंती देखील येते. म्हणून जो कोणी या दिवशी हनुमानाची पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व प्रकारच्या भीतीपासून त्याला मुक्ती मिळते. याशिवाय आरोग्यही चांगले राहते, अशी मान्यता आहे.
शिव चतुर्दशी ही छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशीच्या दिवशीही येते. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला पंचामृत अर्पण केले जाते. असे केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात.
पुराणकथेनुसार, नरकासुर एक दैत्य होता. त्याचा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी नरकासुराचा वध केला. पाहुया, नरकासुराबाबत माहिती-
> नरकासुर हा विष्णु आणि भूदेवी यांचा पुत्र होता.
>नरकासुर प्राग्ज्योतिषपूरनगरचा राजा होता. आजच्या आसाम राज्यालाच प्राग्ज्योतिषपूर मानले जाते.
> नरकासुराने आपल्या शक्तीद्वारे इंद्र, वरुण, अग्नि, वायु अशा देवतांना त्रास दिला.
> त्याने साधू आणि महिलांवर अत्याचार केले आणि १६ हजार स्त्रियांना कैद केले.
> देवता आणि ऋषींनी भगवान श्रीकृष्णाला नरकासुरापासून मुक्ती देण्याची विनंती केली.
> नरकासुराचा वध कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला झाला होता. याच दिवसाला नरक चतुर्दशीच्या नावाने ओळखले जाते.
> नरकासुराच्या वधानंतर भगवान श्रीकृष्णाने १६ हजार स्त्रियांना कैदेतून मुक्त केले.
> नरकासुराच्या वधानंतर लोकांनी आपल्या घरांमध्ये दीपक उजळून आनंद साजरा केला. तेव्हापासून नरक चतुर्दशी आणि दिवाळीचा सण साजरा होऊ लागला.
डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.