मराठी बातम्या  /  धर्म  /  Narad Jayanti Wishes : विश्वाचे पहिले पत्रकार नारद मुनी यांच्या जयंतीनिमित्त प्रियजणांना द्या 'या' खास शुभेच्छा

Narad Jayanti Wishes : विश्वाचे पहिले पत्रकार नारद मुनी यांच्या जयंतीनिमित्त प्रियजणांना द्या 'या' खास शुभेच्छा

May 24, 2024 09:39 AM IST

Narad Jayanti 2024 Wishes : अनेक धार्मिक मान्यतांनुसार नारद मुनींना विश्र्वातील पहिले पत्रकार म्हणून ओळखले जाते. नारायण नारायण कायम ओठी असणाऱ्या या नारद मुनींची आज जयंती असून, त्यांच्या जयंतीनिमित्त प्रियजणांना द्या 'या' खास शुभेच्छा.

नारद जयंतीच्या शुभेच्छा
नारद जयंतीच्या शुभेच्छा

देवऋषी नारद मुनी हे विश्वाचे निर्माते ब्रह्मदेव आणि विद्येची देवी माता सरस्वती यांचे पुत्र आहेत. श्री विष्णूचे निस्सीम भक्त, नारद मुनी संभाषण सुरू करण्यापूर्वी आणि समाप्तीनंतर "नारायण नारायण" म्हणायचे. वैशाख कृष्ण प्रतिपदा तिथी नारद मुनी यांचा जन्म उत्सव म्हणून साजरी करतात. नारद मुनी हे बुद्धी, ज्ञान आणि भक्तीचे मूर्त स्वरूप होते. या शुभ मुहूर्तावर आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवण्यासाठी आणि आपल्या प्रियजणांना संदेश पाठवण्यासाठी या शुभेच्छांचा उपयोग होईल.

ट्रेंडिंग न्यूज

नारद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सृष्टीचे पहिले पत्रकार,

देवर्षी नारद मुनी यांच्या

जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना

खूप खूप शुभेच्छा

नारद जयंतीच्या दिवशी,

नारद ऋषी तुम्हाला

अंधार आणि अज्ञानावर मात करण्यासाठी

ज्ञान आणि बुद्धी देवो,

नारद जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

ब्रह्मा आणि माता सरस्वती यांचे पुत्र

नारद मुनी यांची जयंती

ज्ञानाचा स्वीकार करून अज्ञान दूर करून करा साजरी

नारद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हाला नारद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान नारदांच्या मार्गदर्शनाने तुमचा मार्ग उजळून निघो

कुशलतेने संवाद साधला,

माहिती एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात दिली,

गैरसंवाद मिटवण्यासाठी जगभर प्रवास केला.

अशा नारद मुनी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा

नारद जयंतीच्या शुभ प्रसंगी,

तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना

हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा.

नारायण नारायणाचा जप करा,

प्रभावीपणे संवाद साधून दुरावा संपवा

नारद जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा

भगवान नारदांची शिकवण तुम्हाला

सद्गुणी जीवन जगण्याची प्रेरणा देईल

नारद जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा

नारद या शब्दाचा अर्थ 

नार' या संस्कृत शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे. ('नारं ददाति सः नारदः') नारदांना स्वर्गलोक, मृत्यूलोक व पाताळलोक ह्या तिन्ही लोकांत मुक्त संचार करता येतो.

या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान व ध्यान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी नारद मुनींचे ध्यान करा आणि भगवान विष्णूची पूजा करा, कारण नारद मुनी देखील भगवान विष्णूचे निस्सीम भक्त होते. भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर धूप आणि दिवा लावा आणि मनोभावे पूजा करा.

WhatsApp channel
विभाग