आज २४ मे २०२४ रोजी, समस्त वेदांचे दाता नारद यांची जयंती साजरी केली जात आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि श्रीविष्णूंचे परमभक्त म्हणून नारदांची ओळख आहे. अनेक धार्मिक मान्यतांनुसार नारदांना पहिला पत्रकार म्हणूनही ओळखलं जातं.
यावर्षी नारद जयंती २३ मे रोजी सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल आणि २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजून २४ मिनिटांनी संपेल. उदया तिथीनुसार आज २४ मे रोजी नारद जयंती साजरी केली जाईल.
नारद मुनींचे नाव कानी येताच कानात एकच शब्द गुंजतो 'नारायण-नारायण'. नारद मुनी, ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानानुसार, आकाश, पाताळ तसेच पृथ्वी या तीनही लोकी भ्रमण करून नारदमुनी देव, संत-महात्मे, इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट संवाद साधत असत. त्यांची सुख-दु:खे जाणून घेत अडचणी निवारण्यासाठी प्रयत्न करत. म्हणूनच ते देवांना जेवढे प्रिय होते, तेवढेच ते राक्षस कुळांमध्येही प्रिय होते.
पृथ्वी आणि पाताळलोकातील माहिती देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम देवऋषी नारद करीत असत. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार संगीत आणि वीणाचे जनक नारद ऋषी यांचा जन्म निर्माता ब्रह्मदेवाच्या कंठातून झाला होता. त्याला तिन्ही लोकात हवाई प्रवास करण्याचे वरदान लाभले आहे.
नारद जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील मंदिर स्वच्छ करावे. आंघोळ केल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि तुमच्या आवडत्या देवी-देवतांचे ध्यान करा. आता एका चौरंगावर कापड टाकून नारदाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा. यानंतर दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करावी. नंतर नारादाला फळे आणि मिठाई अर्पण करा.
शेवटी जीवनात सुख-शांती लाभो, अशी प्रार्थना करून कुटुंबातील सदस्यांना प्रसादाचे वाटप करावे. भगवान नारदांची आराधना केल्याने व्यक्तीला शक्ती, बुद्धी आणि पवित्रता प्राप्त होते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते.
नारद मुनी त्यांच्या मागील जन्मी गंधर्व होते, त्यांचे नाव ‘उपबर्हण’ होते. असे मानले जाते की, आपल्या सौंदर्याचा अभिमान असलेला ‘उपबर्हन’ एकदा अप्सरांसोबत परात्पर पिता ब्रह्माजी यांच्याकडे पोशाख करून पोहोचला आणि त्यांच्यासमोर अप्सरांसोबत आनंद घेऊ लागला. त्यामुळे संतप्त होऊन ब्रह्माजींनी त्याला शूद्र योनीत जन्म घेण्याचा शाप दिला. यानंतर त्यांचा जन्म शूद्र नावाच्या दासीच्या पोटी झाला आणि त्या जन्मात भगवान विष्णूची घोर तपश्चर्या करून त्यांना त्यांचा पार्षद आणि ब्रह्मदेवाचा पुत्र होण्याचे वरदान मिळाले. अशाप्रकारे श्रीहरींच्या आशीर्वादाने नारदमुनी ब्रह्माजींचे पुत्र म्हणून प्रकट झाले.
संबंधित बातम्या