नागपंचमीला होत आहेत अत्यंत शुभ योग, करा हे खास उपाय
मराठी बातम्या  /  धर्म  /  नागपंचमीला होत आहेत अत्यंत शुभ योग, करा हे खास उपाय

नागपंचमीला होत आहेत अत्यंत शुभ योग, करा हे खास उपाय

HT Marathi Desk HT Marathi
Published Jul 28, 2025 01:23 PM IST

यावर्षी नागपंचमी २९ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक वर्षांनंतर यंदा नागपंचमीला मंगळागौरी आणि नागपंचमीची युती एकत्र येत आहे. मान्यतेनुसार कालसर्प योगापासून मुक्त होण्यासाठी नागपंचमी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो.

nag panchami 2025
nag panchami 2025

Nag Panchami : यंदा २९ जुलै रोजी येणाऱ्या नागपंचमीला पाच खास योग येत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक वर्षांनंतर यंदा नागपंचमीला मंगळागौरी आणि नागपंचमीची युती एकत्र येत आहे. मान्यतेनुसार कालसर्प योगापासून मुक्त होण्यासाठी नागपंचमी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. यावेळी नागपंचमीला पूजा करणाऱ्यांना भगवान शिव, माता पार्वती, नागदेव तसेच शक्तीचा आशीर्वाद मिळेल. तब्बल ४४ वर्षांनंतर नागपंचमीला मंगळागौरी योगाचा अद्भुत योगायोग तयार होत आहे.

या दिवशी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करणे आणि पूजेदरम्यान नाग गायत्रीचा जप करणे खूप लाभदायक ठरते. यंदा नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्याची उत्तम वेळ सकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून ८ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल. या काळात पूजा वगैरे करावी.

नागपंचमीला करा हे उपाय

घराच्या मुख्य दरवाजावर करा हे काम - नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेण, गेरू किंवा मातीने सापाचा आकार तयार करावा. त्याची विधिवत पूजा करा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कालसर्प दोषामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर होतील.

राहू आणि केतूचे मंत्र जप करा - नागपंचमीतील राहू आणि केतूच्या मंत्रांचा जप करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी राहू मंत्र - 'ऊँ रां राहवे नमः' आणि केतू मंत्र - 'ऊँ कें केतवे नमः' चा जप करावा.

भैरव बाबांची पूजा करा - नागपंचमीच्या दिवशी भैरव बाबांची पूजा करणेही शुभ असते. या दिवशी भैरव बाबांना पूजेच्या वेळी कच्चे दूध अर्पण करावे.

झाडू मारा - या शुभ मुहूर्तावर नागदेवता किंवा शिवमंदिरात जाऊन झाडू मारा. धार्मिक स्थळाच्या पायऱ्यांवर पोछा लावा.

डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner