Nag Panchami Wishes : श्रावणातील पहिला सण असलेल्या नागपंचमीच्या प्रियजणांना द्या हटके शुभेच्छा, हे संदेश पाहा!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Nag Panchami Wishes : श्रावणातील पहिला सण असलेल्या नागपंचमीच्या प्रियजणांना द्या हटके शुभेच्छा, हे संदेश पाहा!

Nag Panchami Wishes : श्रावणातील पहिला सण असलेल्या नागपंचमीच्या प्रियजणांना द्या हटके शुभेच्छा, हे संदेश पाहा!

Published Aug 06, 2024 10:37 PM IST

Nag Panchami 2024 Wishes : यंदा ९ ऑगस्ट रोजी नागपंचमी असून, परंपरेनुसार नागपंचमी सण साजरा करा आणि आताच्या ट्रेंडनुसार आपल्या नातलगांना, मित्र-मैत्रीणींना नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश पाठवा.

नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंचमीच्या शुभेच्छा

श्रावण हा सण-उत्सव, व्रत-वैकल्याचा खास महिना असतो. या संपूर्ण महिन्यात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्व असते. ५ ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू झाला असून ३ सप्टेंबर रोजी श्रावण महिना संपन्न होईल. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी हा सण साजरा करण्यात येतो. यंदा ९ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे.

नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय सणसमारंभ हे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देत असतात. असं म्हणतात की, नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुखरूप आले होते. त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजा केली जाते. या दिवशी भारतात नाग अथवा सापाला दूध, फळं, गोडाचे पदार्थ, फुले अर्पण केली जातात. नागपूजा करण्यासाठी नाागाची मातीची प्रतिमा घरात स्थापन केली जाते किंवा नागाचे बिळ असेल त्या ठिकाणी जाऊन पूजा केली जाते.

चला तर मग यंदाच्याही वर्षी परंपरेनुसार नागपंचमी साजरी करूया आणि आताच्या ट्रेंडनुसार आपल्या नातलगांना, मित्र-मैत्रीणींना नागपंचमीचे शुभेच्छा संदेश पाठवूया.

नागपंचमीच्या शुभेच्छा

सण आला नागपंचमीचा,

मनापासून शुभेच्छा तुम्हाला

सदैव सुखी, आनंदी राहा,

हिच आमची सदिच्छा

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

बळीराजाचा कैवारी

पूजा त्याची होते घरोघरी…

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर

ईश्वराची सदा कृपा असावी आणि

तुमचे आयुष्य मंगलदायी असावे

नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा

मान ठेवूया नाग राजाचा,

पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

नागपंममीचा सण आला,

पर्जन्यराजाला आनंद झाला

न्हाहून निघाली वसुधंरा,

घेतला हाती हिरवा शेला…

नागपंचमीच्या शुभेच्छा

वसंत ऋतूच्या आगमनी,

कोकिळा गाई मंजुळ गाणी,

नागपंचमीच्या शुभदिनी,

सुख समृद्धी नांदो जीवनी…

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

दूध लाह्या वाहू नागोबाला,

चल गं सखे जाऊ वारूळाला

नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा

मातीच्या नागाची पूजा करा

जिवंत नागाचा नको अट्टाहास

निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण

ईश्वररूपी नागाचे रक्षण आणि निसर्गाचे जतन करूया

त्यासाठी हाच आहे तो खास क्षण

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

निसर्गाच्या बांधीलकीतून

नागपंचमीचा सण निर्माण झाला

शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा

महादेवाच्या गळ्यातील हार झाला

नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा

Whats_app_banner