Nag Panchami 2024 Date and Shubh Muhurat : सनातन धर्मात नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेच्या पूजेला खूप महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा केल्याने कालसर्प दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते, असे मानले जाते. कॅलेंडरनुसार नागपंचमी यंदा ९ ऑगस्टला साजरी होणार आहे. या दिवशी प्रामुख्याने आठ सर्प देवतांची (वासुकी, ऐरावत, मणिभद्र, कालिया, धनंजय, तक्षक, कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र) पूजा केली जाते. जाणून घेऊया नागपंचमीची नेमकी तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व...
पंचांगानुसार, यावर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ०९ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे उदयातिथीनुसार नागपंचमी ९ ऑगस्टलाच साजरी केली जाणार आहे.
या दिवशी पूजेची शुभ वेळ दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी १ वाजता संपेल. या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेच्या पूजेला खूप महत्त्व आहे. नागदेवतेची पूजा करण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ३३ मिनिटे ते रात्री ८ वाजून २० मिनिटांची सर्वोत्तम वेळ असेल.
नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला.
शिवलिंगावर जल अर्पण करा आणि भगवान शंकराची पूजा करा.
यानंतर घराचे प्रवेशद्वार, मंदिर आणि स्वयंपाकघराच्या बाहेरील दरवाजा स्वच्छ पाण्याने धुआ.
त्यावर कोळशाच्या किंवा रांगोळीच्या साह्याने सर्प देवतेचे प्रतीक बनवा किंवा सर्पदेवतेची मूर्तीही घरी आणू शकता.
यानंतर पूजा सुरू करून नागदेवतेला फळे, फुले, धूप-दीप, कच्चे दूध आणि नैवेद्य अर्पण करा.
शेवटी नागदेवतेचे ध्यान करून पूजा व आरती करावी.
आरती झाल्यावर नागपंचमीची कथा वाचा.
शक्य असल्यास पूजेनंतर शेतात किंवा नागाचे बिळ असेल त्या ठिकाणी दुधाची वाटी ठेवावी.
नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारणं सांगितले जातात. नाग हा महादेवाला प्रीय होता. महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते. त्यामुळे महादेवाच्या श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि नागांची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्पदोष दूर होत असल्याचे सांगितले जाते.
नाग देवतांच्या मूर्तीला दूध, मिठाई आणि फुले अर्पण करा.
नाग पंचमी मंत्राचा जप करा.
ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावे.
या दिवशी काय करू नये
नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये. त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो.
या दिवशी झाडे तोडू नका. यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते.
शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नका कारण ते अशुभ मानले जाते.
नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका.
संबंधित बातम्या