Nag Panchami 2024 : हे ऐतिहासिक मंदिर फक्त नागपंचमीलाच उघडते, जगात कुठेच नाही अशी मूर्ती, पाहा-nag panchami 2024 nagchandreshwar temple of ujjain on nag panchami nagchandreshwar temple opening day timings know here ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Nag Panchami 2024 : हे ऐतिहासिक मंदिर फक्त नागपंचमीलाच उघडते, जगात कुठेच नाही अशी मूर्ती, पाहा

Nag Panchami 2024 : हे ऐतिहासिक मंदिर फक्त नागपंचमीलाच उघडते, जगात कुठेच नाही अशी मूर्ती, पाहा

Aug 03, 2024 08:58 PM IST

आज आम्ही तुम्हाला एका खास मंदिराविषयी सांगणार आहोत, जे वर्षभर बंद असते आणि फक्त नागपंचमीच्या दिवशीच उघडते

Nag Panchami 2024 : हे ऐतिहासिक मंदिर फक्त नागपंचमीलाच उघडते, जगात कुठेच नाही अशी मूर्ती, पाहा
Nag Panchami 2024 : हे ऐतिहासिक मंदिर फक्त नागपंचमीलाच उघडते, जगात कुठेच नाही अशी मूर्ती, पाहा

वैदिक दिनदर्शिकेनुसार नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. अशा परिस्थितीत यावर्षी नागपंचमी शुक्रवारी (९ ऑगस्ट) साजरी केली जाणार आहे. ही तारीख भगवान शंकराच्या पूजेसाठी तसेच नागदेवतेच्या पूजेसाठी समर्पित मानली जाते.

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका खास मंदिराविषयी सांगणार आहोत, जे वर्षभर बंद असते आणि फक्त नागपंचमीच्या दिवशीच उघडते.

नागचंद्रेश्वराचे मंदिर कधी उघडणार?

यावेळी नागपंचमी निमित्त नागचंद्रेश्वराचे दरवाजे ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजता उघडण्यात येणार असून ते ९ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ पर्यंत खुले राहणार आहे.

अशा स्थितीत भाविकांना २४ तास नागचंद्रेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. असे मानले जाते की या मंदिरात येणाऱ्या कोणत्याही भक्ताला सर्प दोषापासून मुक्ती मिळते. त्यामुळेच मंदिर उघडल्यावर येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

नागचंद्रेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य काय?

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या शिखरावर नागचंद्रेश्वर विराजमान आहे. येथे नागदेवतेची अप्रतिम मूर्ती स्थापित केली आहे, जी ११ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. हा नागचंद्रेश्वराची मूर्ती नेपाळमधून भारतात आणण्यात आल्याचेही सांगितले जाते.

या मूर्तीमध्ये नागदेवतेने आपला फणा पसरवला असून त्याच्यावर शिव आणि पार्वती विराजमान आहेत. हे एकमेव मंदिर आहे जिथे भगवान विष्णू ऐवजी भगवान भोलेनाथ नागावर विराजमान आहेत. या मंदिराचे दरवाजे वर्षभर फक्त २४ तास उघडतात. नागपंचमीला नागचंद्रेश्वराची तीन वेळा पूजा केली जाते.

nagchandreshwar temple of ujjain
nagchandreshwar temple of ujjain

नागचंद्रेश्वराचे मंदिर एकदाच का उघडते?

पौराणिक कथेनुसार, एकदा सर्पांचा राजा तक्षक याने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येने भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्प राजा तक्षकाला अमरत्वाचे वरदान दिले. यानंतर तक्षक नागा भगवान शंकराच्या सहवासात राहू लागला.

परंतु महाकाल वनात वास्तव्य करण्याआधी सर्प राजा तक्षकाला आपल्या एकांतात कोणताही त्रास होऊ नये अशी इच्छा होती. त्यामुळेच ते नागपंचमीच्या निमित्तानेच दिसतात.

विभाग