Muscular Baba in Mahakumbha: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. या मेळ्याचे केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशातील नागरिकांना देखील आकर्षण आहे. या कुंभमेळ्याला सर्वसामान्य नागरिकांबरोबरच नागा साधू आणि साधूसंत गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगमावर एकत्र आले आहेत. या साधूंमध्ये येथे आलेल्या आत्मा प्रेमगिरी महाराज यांची विशेष चर्चा आहे. हे महाराज त्यांच्या पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखले जातात. त्यांच्या मजबूत स्नायूंमुळे त्यांना "मस्क्युलर बाबा" असे टोपणनाव मिळाले आहे.
मस्क्युलर बाबा आत्मा प्रेमगिरी महाराज यांची उंची सात फूट आहे. त्यांनी भगवे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यांच्या दंडांवर आणि मनगटांवर 'रुद्राक्षांच्या माळा' आहेत. महाकुंभमेळ्यात त्यांची उपस्थिती उत्सुकतेला उधाण आणत आहे, अनेकांनी त्यांना हिंदू पौराणिक कथांमधील एक आदरणीय व्यक्तिमत्व भगवान परशुराम यांचे आधुनिक काळातील अवतार म्हणून वर्णन केले आहे. त्यांच्या शक्ती आणि योद्ध्यासारख्या गुणांसाठी ओळखले जाणारे भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत.
मस्क्युलर बाबा हे मूळचे रशियाचे आहेत. त्यांनी ३० वर्षांपूर्वी सनातन धर्म स्वीकारला. त्यानंतर ते हिंदू धर्माच्या प्रचारासाठी आपले जीवन समर्पित करत आहेत. ते शिक्षक होते. त्यांनी आपला शिक्षकी पेशा सोडून ध्यात्मिक कार्यात स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला. ते नेपाळमध्ये राहतात आणि हिंदू धर्माचा प्रचार करण्यात त्यांचे आयुष्य घालवतात. ते जुना अखाड्याचे सदस्य देखील आहेत. जुना आखाडा हा प्रमुख हिंदू मठांपैकी एक आहे.
मस्क्युलर बाबाचा फोटो एका वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये त्यांची प्रभावी शरीरयष्टी दिसून येत होती. या पोस्टने बरेच लक्ष वेधले होते. कमेंट सेक्शनमध्ये "हर हर महादेव" असा जयघोष केलेला दिसत होता.
आत्मा प्रेमगिरी यांच्याव्यतिरिक्त, आणखी एक उल्लेखनीय व्यक्ती म्हणजे माजी एरोस्पेस अभियंता अभय सिंग. सिंह हे "आयआयटी बाबा" म्हणून ओळखले जातात. हरियाणाचे रहिवासी असलेले सिंग यांनी त्यांची वैज्ञानिक कारकीर्द सोडून आध्यात्मिक प्रवासात स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला.
महंत राजपुरीजी महाराज यांची "कबूतरवाले बाबा" (कबुतर संत) अशी ओळख आहे. ते देखील या कुंभमेळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या महंताने हरीपुरी नावाच्या कबुतरासह जवळजवळ एक दशक घालवले आहे. हे कबुतर शांतपणे त्यांच्या डोक्यावर बसते. महंत राजपुरीजी यांच्यासाठी, त्यांचे हे कबुतर सर्व प्राण्यांप्रती सुसंवाद आणि दयाळूपणाच्या त्यांच्या मूळ तत्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करते.
संबंधित बातम्या