Siddhivinayak Ganpati Mandir : मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धिविनायक गणपती मंदिर बुधवारपासून ते रविवारपर्यंत पुढील पाच दिवसांसाठी बंद राहणार आहे. या सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी साकडे घालतात. परंतु येत्या ११ ते १५ डिसेंबर या पाच दिवसांसाठी सिद्धिविनायक मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना १६ डिसेंबरपासून घेता येणार आहे.
बुधवार ११ डिसेंबर ते रविवार १५ डिसेंबर पर्यंत श्रींच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार असून, यामुळे पाच दिवस मंदिर बंद राहील असे सांगितले जात आहे. परंतू या दरम्यान सिद्धिविनायकाच्या प्रतिमूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तर बुधवारी १८ डिसेंबर रोजी संकष्ट चतुर्थीच्या खास दिवशी भाविकांना श्रींच्या मुख्य प्रतिमेचे दर्शन घेता येईल.
भारतात अनेक मोठी आणि प्राचीन गणपती मंदिरे आहेत. सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिरे महाराष्ट्रात आहेत. यापैकी एक मुंबईत आहे जिथे लोक लांबून येतात. सेलिब्रिटीही या मंदिराला भेट देतात. येथे श्रीगणेशाचे दर्शन व पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. त्यामुळे या मंदिराचे नाव सिद्धिविनायक मंदिर आहे.
सिद्धिविनायक मंदिरालाही एक प्राचीन इतिहास आहे. दादर येथील प्रभादेवी भागात असलेले हे भव्य मंदिर सर्वांचेच मोठे आणि महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो. या दिवशी विशेष करून भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी आवर्जुन येतात. दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात गणपतीची सर्वात लोकप्रिय मंदिरे आहेत, त्यापैकी एक सिद्धिविनायक मंदिर आहे. येथे बसवलेल्या गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे असल्यामुळे या मंदिराचे नाव सिद्धिविनायक आहे. गणपतीची अशी मूर्ती असलेले मंदिर हे सिद्धपीठ मानले जाते. गणपतीचे दुसरे नाव विनायक आहे, म्हणून या मंदिराला सिद्धिविनायक म्हणतात. हे मंदिर १९ नोव्हेंबर १८०१ रोजी बांधले गेले.
सिद्धिविनायक मंदिराची आरती भाविकांसाठी विशेष मानली जाते. विशेषत: मंगळवारी पहाटे ३.१५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुमारे ६ प्रकारच्या आरत्या केल्या जातात. मंगळवारी श्री दर्शन आरती, काकड आरती, नैवेद्य आरती, रात्री प्रार्थना आणि रात्रीची आरती झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. याशिवाय मंदिरात होणाऱ्या अभिषेक आरती आणि चंद्रोदय आरतीमध्येही सहभागी होता येईल.
संबंधित बातम्या