Muharram Wishes : १७ तारखेला मोहरम, तुमच्या नातलगांना हे खास मॅसेज देऊन तुमचा दिवस करा साजरा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Muharram Wishes : १७ तारखेला मोहरम, तुमच्या नातलगांना हे खास मॅसेज देऊन तुमचा दिवस करा साजरा

Muharram Wishes : १७ तारखेला मोहरम, तुमच्या नातलगांना हे खास मॅसेज देऊन तुमचा दिवस करा साजरा

Published Jul 15, 2024 07:33 PM IST

Muharram 2024 Wishes : मोहरम हा इस्लाममधील पहिला महिना आहे. बुधवार १७ जुलै २०२४ रोजी मोहरम असून, हे खास मॅसेज देऊन मोहरम साजरी करूया.

मोहरमच्या शुभेच्छा
मोहरमच्या शुभेच्छा

इस्लाम धर्मात रमजान आणि मोहरम या महिन्यांना जास्त महत्व आहे, हे अतिशय पवित्र महिने समजले जातात. या दोन महिन्यांना प्रचंड महत्व आहे. इस्लामिक नववर्षाला सुरुवात झाली आहे. ज्याला आपण 'मोहरम' या नावाने ओळखतो. मोहरम हा इस्लाममधील पहिला महिना आहे.

हिजरी कॅलेंडरनुसार हे १४४६ वर्ष सुरू आहे. इस्लामिक कॅलेंडर चंद्रानुसार कार्यरत असते. त्यामुळे नवीन तारीख सूर्यास्तानंतर म्हणजेच मगरीबच्या वेळी सुरू होते. आपण पाहिलं की मोहरम हा इस्लाममधील पहिला महिना आहे. तर इस्लामिक कॅलेंडरनुसार इस्लाम धर्मात मोहरमनंतर सफर, रबीउल-अव्वल, रबीउल-आखिर, जुमादिल अव्वल, जुमादिल आखिर, रज्जब, शाअबान, रमजान, शव्वाल, जिल काअदह, जिलहिज्जा या महिन्यांचा समावेश होतो.

इस्लाम धर्मातील कॅलेंडरमधील संकल्पनेला 'हिजरी' असे म्हटले जाते. तज्ञांच्या अभ्यासानुसार इस्लामिक कॅलेंडर आणि ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये प्रचंड मोठा फरक आढळतो. इस्लामिक कॅलेंडरमध्ये चंद्राच्या हालचालींवरुन तारखा निश्चित केल्या जातात.

वास्तविक हा महिना शोक व्यक्त करण्याचा महिना समजला जातो. कारण या महिन्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे लाडके नातू इमाम हसन-हुसैन हे युद्धात शहीद झाले होते. मोहरमचे हे दहा दिवस मुस्लिमांसाठी प्रचंड महत्वाचे असतात. याकाळात सर्व दर्गेमध्ये पीर बसवले जातात. यामध्ये नवव्या दिवसाला कत्तल रात्र आणि दहाव्या दिवसाला दफन असे संबोधले जाते. बुधवार १७ जुलै २०२४ रोजी मोहरम असून, हे खास मॅसेज देऊन मोहरम साजरी करूया.

मोहरमच्या शुभेच्छा

तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी

मोहरमच्या खूप खूप शुभेच्छा

त्याग, श्रद्धा आणि कृतज्ञता लक्षात आणून देणारे हे वर्ष राहो

मोहरमच्या हार्दिक शुभेच्छा

मोहरम सर्व कुटुंबांना आणि व्यक्तींना

भरपूर आशीर्वाद आणि समृद्धी घेऊन येवो

मोहरमच्या हार्दिक शुभेच्छा

हा मोहरम सर्व मानवजातीसाठी

प्रेम, क्षमा आणि समजूतदारपणाचा काळ असू दे

मोहरमच्या शुभेच्छा

तुमच्या कुटुंबाला

आशीर्वादित आणि निरोगी जीवन लाभो

मोहरमच्या मनपूर्वक शुभेच्छा...

शांती, सुख आणि समृद्धीने भरलेले वर्ष असावे 

सर्वजणांंना आशीर्वाद लाभावा अशी, 

अल्लाहकडे प्रार्थना करूया.

मोहरम मुबारक!

तुम्हाला शांतता,

आशा आणि एकतेने भरलेल्या

मुहर्रमच्या शुभेच्छा

सर्वांना येणारे नवीन वर्ष नीरोगी जाओ

सर्वांना नव्याने हे वर्ष लाभाचे राहो

मोहरमच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हाला प्रेम, हशा आणि आशीर्वादांनी भरलेल्या 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 

मोहरम मुबारक

Whats_app_banner