Muharram : इस्लाममधील पहिला महिना 'मोहरम'ला सुरूवात! जाणून घ्या महत्व आणि मान्यता
मराठी बातम्या  /  धर्म  /  Muharram : इस्लाममधील पहिला महिना 'मोहरम'ला सुरूवात! जाणून घ्या महत्व आणि मान्यता

Muharram : इस्लाममधील पहिला महिना 'मोहरम'ला सुरूवात! जाणून घ्या महत्व आणि मान्यता

Jul 09, 2024 10:53 AM IST

इस्लाममधील पवित्र महिन्यांपैकी एक मोहरम महिन्याची सुरुवात झाली आहे. मोहरम हा इस्लाम कॅलेंडरमधील पहिला महिना आहे.

मोहरम २०२४
मोहरम २०२४

भारतामध्ये नेहमीच विविधतेत एकता पाहायला मिळते. आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. प्रत्येक धर्माचे एक खास वैशिष्ट्य आहे. शिवाय प्रत्येक धर्मात विविध सण साजरे केले जातात. या प्रत्येक सणामागे एक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व दडलेले आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती आपल्या धर्मावर प्रेम आणि दुसऱ्या धर्माचा आदर करताना दिसून येतो. बहुतांश लोकांना इतर धर्मांबाबत जाणून घेण्याचे नेहमीच कुतूहल असते. एखाद्या धर्मात तो सण का साजरा केला जातो? त्याचे नेमके महत्व काय? असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनात घोळत असतात. आजसुद्धा असेच काहीसे आहे.

इस्लाममधील पवित्र महिन्यांपैकी एक मोहरम महिन्याची सुरुवात झाली आहे. मोहरम हा इस्लाम कॅलेंडरमधील पहिला महिना आहे. हा महिना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे दोन नातू होते. इमाम हसन आणि इमाम हुसैन अशी त्यांची नावे होती. इमाम हसन आणि इमाम हुसैन हे करबला मैदानावर झालेल्या युद्धात शहीद झाले होते. हे युद्ध मोहरम महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झाले होते. त्यामुळे या महिन्यात पहिल्या आठवड्यात हे शोकप्रदर्शन केले जाते. सर्वसामान्य भाषेत लोक त्याला मोहरम सण असे म्हणतात. ७ जुलै २०२४ रोजी चंद्रप्रदर्शनानंतर कुदळ पडली. आणि त्यांनंतर आज पीर बसवण्यात आले आहेत. देशभरातील दर्गेमध्ये तब्बल १० दिवस हा सण चालतो. यामध्ये नवव्या दिवसाला कत्तल रात्र आणि दहाव्या दिवसाला दफन असे संबोधले जाते.

इस्लामिक कॅलेंडरमधील पहिला महिना-

आज इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना अर्थातच मोहरमला प्रारंभ झाला आहे. मोहरम हा इस्लामिक धर्मातील पहिला महिना आहे. इस्लाम धर्मातील कॅलेंडरमधील संकल्पनेला हिजरी असे म्हटले जाते. तज्ञांच्या अभ्यासानुसार इस्लामिक कॅलेंडर आणि ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये प्रचंड मोठा फरक आढळतो. इस्लामिक कॅलेंडरमध्ये चंद्राच्या हालचालींवरुन तारखा ठरविल्या जातात. शिवाय ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये ३६५ दिवस असतात. तर इस्लामिक कॅलेंडरमध्ये ३५५ दिवस असतात. त्यामुळेच मोहरमची तारीख प्रत्येक वर्षी बदलत असते.

मोहरमचे महत्व

इस्लामिक मान्यतेनुसार 'मोहरम' हा एक शोक प्रदर्शन करण्याचा महिना आहे. कारण याच महिन्यात इस्लामिक धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद यांचे नातू आपल्या साथीदारांसोबत शहीद झाले होते. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या लाडक्या कन्या हजरत बिबी फातिमा यांची ती मुले होय. मोहरम महिन्यात करबलाच्या मैदानावर इमाम हुसैन यांनी आपल्या ७२ सैनिकांच्या मदतीने युद्ध केले होते. सध्या इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये हे करबला नावाचे गाव स्थित होते. हे युद्ध त्यांनी आपला भाऊ इमाम हसन यांच्या दगाबजित झालेल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी केले होते. मात्र एकतर्फी झालेल्या या युद्धात ते आपल्या ७२ साथीदारांसोबत शहीद झाले होते. त्यामुळेच हा महिना शोक प्रदर्शनाचा महिना म्हटला जातो. या युद्धाला 'तारीख-ए-इस्लाम' असेदेखील संबोधले जाते.

इमाम हसन-हुसैन यांच्या युद्धाची पार्श्वभूमी

त्याकाळात इस्लामच्या प्रथेनुसार धर्माचा प्रमुख निवडण्याची एक पद्धत होती. इस्लामच्या प्रमुखाला 'खलिफा' असे संबोधले जात होते. इस्लामचे सर्वात लोकप्रिय प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यानंतर इस्लाम धर्मात तब्बल ४ खलिफा झाले. पाचवे खलिफा आमिर मुआविया हे होते. आमिर मुआविया यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र असलेल्या यजिदने स्वतःला खिलफा घोषित केले. परंतु इस्लाम धर्मात स्वतःला खिलफा म्हणजेच प्रमुख ठरविण्याचा नियम स्थित नव्हता. शिवाय यजिद हा अत्यंत क्रूर व्यक्ती होता. त्यामुळेच त्याला खलिफा मान्य करणे कोणत्याच व्यक्तीला शक्य नव्हते. मात्र हजरत मोहम्मद यांचे नातू असणाऱ्या इमाम हसन-हुसैन यांच्याकडून त्यांना मान्यता हवी होती शिवाय लोकांची मर्जी मिळवण्यास मदत हवी होती. मात्र हसन-हुसैन यांनी त्याला नकार दिला.

त्यामुळे क्रूर यजिदने आपल्या विरोधात मत जाहीर करणाऱ्याचे डोके धडापासून वेगळे करण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला. परंतु इमाम हसन यांनी त्याच्या आदेशाला धुडकावून लावत मक्केकडे प्रवास केला. याने यजिद क्रोधीत झाला, आणि त्याने हसन यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संपविण्याचा कट रचला. शेवटी दगाबाजी करुन त्याने हसन यांचा बळी घेतला. या दगाबजित झालेल्या आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हुसैन यांनी अवघ्या ७२ सैनिकांच्या मदतीने क्रूर यजिदसोबत युद्ध केले. इमाम हसन यांनी शेवटपर्यंत अगदी धैर्याने त्याला तोंड दिले. शेवटी संख्याबळ कमी असलयाने यजिदने त्यांचाही बळी घेतला. हे युद्ध करबलाच्या मैदानावर झाले होते. हजरत हसन-हुसैन हे लोकांच्या चांगल्यासाठी लढता लढता शहीद झाले होते. त्यामुळेच मोहरमचा हा महिना शोक व्यक्त करण्याचा महिना म्हणून ओळखला जातो.

Whats_app_banner