Monthly Durga Ashtami in December : मासिक दुर्गा अष्टमी कधी आहे? जाणून घ्या, पूजेची तारीख आणि पूजाविधी!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Monthly Durga Ashtami in December : मासिक दुर्गा अष्टमी कधी आहे? जाणून घ्या, पूजेची तारीख आणि पूजाविधी!

Monthly Durga Ashtami in December : मासिक दुर्गा अष्टमी कधी आहे? जाणून घ्या, पूजेची तारीख आणि पूजाविधी!

Dec 02, 2024 10:22 PM IST

Monthly Durga Ashtami: शुक्ल पक्षातील अष्टमीचा दिवस दुर्गा मातेला समर्पित असतो. या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते.

मासिक दुर्गा अष्टमी कधी आहे? जाणून घ्या, पूजेची तारीख आणि पूजाविधी!
मासिक दुर्गा अष्टमी कधी आहे? जाणून घ्या, पूजेची तारीख आणि पूजाविधी!

Monthly Durga Ashtami: मासिक दुर्गाष्टमीला सनातन धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मासिक दुर्गाष्टमीचे व्रत दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी केले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीचा दिवस देवी दुर्गाला समर्पित आहे. या दिवशी देवी दुर्गाची पूजा केली जाते. या महिन्यात ९ डिसेंबर या दिवशी मासिक दुर्गाष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी दुर्गा मातेची पूजा केल्यास जीवनात सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. जाणून घेऊ या, मासिक दुर्गा अष्टमी पूजा विधी आणि शुभ मुहूर्त-

मासिक दुर्गा अष्टमी कधी आहे?

हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी ८ डिसेंबर रोजी सकाळी ०९ वाजून ४४ मिनिटांनी सुरू होईल. दिनांक ०९ डिसेंबर रोजी सकाळी ०८ वाजून ०२ मिनिटांनी संपणार आहे. उदय तिथीनुसार ०९ डिसेंबर रोजी मासिक दुर्गाष्टमीचे व्रत केले जाईल.

दुर्गामातेचा पूजा विधी

१- स्नान आदि केल्यानंतर मंदिर स्वच्छ करावे.

२- दुर्गामातेला पाण्याचा अभिषेक करावा (जलाभिषेक)

३- दुर्गामातेला पंचामृतासह गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा.

४- त्यानंतर मातेला लाल चंदन, कुंकू, श्रृंगार वस्तू आणि लाल फुले अर्पण करावी.

५- मंदिरात तुपाचा दिवा लावा.

६- पूर्ण भक्तीभावाने माता दुर्गेची आरती करा

७- दुर्गामातेला भोग चढवा

८- शेवटी क्षमायाचनेसाठी प्रार्थना करा

दुर्गामातेची आरती

ॐ जय अम्बे गौरी…

जय अम्बे गौरी, मैया जय श्यामा गौरी ।

तुमको निशदिन ध्यावत, हरि ब्रह्मा शिवरी ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

मांग सिंदूर विराजत, टीको मृगमद को ।

उज्ज्वल से दोउ नैना, चंद्रवदन नीको ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

कनक समान कलेवर, रक्ताम्बर राजै ।

रक्तपुष्प गल माला, कंठन पर साजै ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

केहरि वाहन राजत, खड्ग खप्पर धारी ।

सुर-नर-मुनिजन सेवत, तिनके दुखहारी ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

कानन कुण्डल शोभित, नासाग्रे मोती ।

कोटिक चंद्र दिवाकर, सम राजत ज्योती ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

शुंभ-निशुंभ बिदारे, महिषासुर घाती ।

धूम्र विलोचन नैना, निशदिन मदमाती ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

चण्ड-मुण्ड संहारे, शोणित बीज हरे ।

मधु-कैटभ दोउ मारे, सुर भयहीन करे ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

ब्रह्माणी, रूद्राणी, तुम कमला रानी ।

आगम निगम बखानी, तुम शिव पटरानी ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

चौंसठ योगिनी मंगल गावत, नृत्य करत भैरों ।

बाजत ताल मृदंगा, अरू बाजत डमरू ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

तुम ही जग की माता, तुम ही हो भरता,

भक्तन की दुख हरता । सुख संपति करता ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

भुजा चार अति शोभित, खडग खप्पर धारी ।

मनवांछित फल पावत, सेवत नर नारी ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

कंचन थाल विराजत, अगर कपूर बाती ।

श्रीमालकेतु में राजत, कोटि रतन ज्योती ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

श्री अंबेजी की आरति, जो कोइ नर गावे ।

कहत शिवानंद स्वामी, सुख-संपति पावे ॥

ॐ जय अम्बे गौरी..॥

जय अम्बे गौरी, मैया जय श्यामा गौरी ।

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner