Mokshada Ekadashi Wishes In Marathi : प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात, ज्याचे नाव आणि महत्व भिन्न भिन्न असते. भगवान विष्णूच्या उपासनेसाठी मोक्षदा एकादशीचे व्रत विशेष मानले जाते. या दिवशी उपवास केल्याने तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या पूर्वजांना मोक्ष मिळण्याचा मार्गही मोकळा होतो.
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले जाते आणि या दिवशी पितरांच्या नावाने वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने आपला प्रिय मित्र अर्जुन याला गीतेचा उपदेश केला, म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीचा उत्सवही साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते. बुधवार ११ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी व्रत केले जाणार असून, मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीला प्रियजनांना या खास शुभेच्छा पाठवा.
ॐ नारायणाय विद्महे।
वासुदेवाय धीमहि।
तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
वन्दे विष्णुम भवभयहरं सर्व लोकेकनाथम।
मोक्षदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
...
हरि मनीं हरि चित्तीं हरि अंकु शरीरीं ।
तयातें देखोनि हरि चार्ही बाह्या पसरीं...
मोक्षदा एकादशीच्या शुभेच्छा
...
लक्ष्मी वल्लभा
दीनानाथा पद्मनाभा
सुख वसे तुझे पायीं,
मज ठेवी तेचि पायी
मोक्षदा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
...
पाणी घालते तुळशीला
वंदन करते देवाला
सदा आंनदी ठेव माझ्या नातलगं आणि मित्रांना
मोक्षदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
...
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ।
मोक्षदा एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा
...
घेई घेई माझे वाचे,
गोड नाम विठोबाचे,
तुम्ही घ्यारे डोळे सुख,
पाहा विठोबाचे मुख
मोक्षदा एकादशीनिमित्त शुभेच्छा
...
एकादशीस अन्नपान ।
जे नर करिती भोजन ।
श्वानविष्ठेसमान ।
अधम जन ते एक ॥१॥
ऎका व्रताचें महिमान ।
नेमें आचरती जन ।
गाती ऎकती हरिकिर्तन ।
ते समान विष्णुसीं
मोक्षदा एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा
…
तुमचे घर आणि अंगण समृद्धीने भरलेले राहो...
तुमची सर्व कामे अडथळे न येता पूर्ण होवो
हीच विष्णू चरणी प्रार्थना...
मोक्षदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
शांती, समृद्धी आणि आनंदाने भरलेल्या
एकादशीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
विष्णू देव तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना
भरपूर आशीर्वाद देवो.
संबंधित बातम्या