मराठी बातम्या  /  religion  /  Mokshada Ekadashi 2022 : मोक्ष देणारी एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी आज, कोणते आहेत शुभ मुहूर्त?
मोक्षदा एकादशी आज
मोक्षदा एकादशी आज (हिंदुस्तान टाइम्स)

Mokshada Ekadashi 2022 : मोक्ष देणारी एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी आज, कोणते आहेत शुभ मुहूर्त?

03 December 2022, 9:58 ISTDilip Ramchandra Vaze

Shubh Muhurta & Importance Of Mokshada Ekadashi : मोक्षदा एकादशीचं व्रत आज म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध ११ अर्थात ३ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होत आहे.

मोक्षदा एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. ही एकादशी खासकरुन भगवान विष्णूला समर्पित आहे. एकादशी तिथी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षात येते. मोक्षदा एकादशीचं व्रत आज म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध ११ अर्थात ३ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होत आहे. पिकरांना मोक्ष मिळवून देणारी एकादशी म्हणूनही या एकादशीकडे पाहिलं जातं.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे मोक्षदा एकादशीचं महत्व

आजच्याच दिलशी भगवान श्रीविष्णू यांनी करु क्षेत्रात अर्जुनाला गीतेचं ज्ञान दिलं होतं. म्हणूनच या दिवसाला गीता जयंती असंही संबोधलं जातं.धार्मिक मान्यता असंही सांगते की या दिवशी व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

कोणते आहेत मोक्षदा एकादशीचे शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हटलं जातं. यंदा मोक्षदा एकादशी ३ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होईल आणि ४ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजून ३४ मिनिटांनी संपेल.

४ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी साजरी होणार आहे.

३ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी व्रत साजरं केलं जाणार आहे.

कशी करावी मोक्षदा एकादशी पूजा

सकाळी लवकर उठा आणि आंघोळ करुन शुद्ध व्हा.

घरातल्या देवघरात दिवा लावा.

श्रीविष्णूंना गंगेच्या पाम्याने अभिषेक करा.

श्रीविष्णूंना फूलं आणि तुळशीची पानं अर्पण करा.

शक्य झाल्यास या दिवशी उपवास करा.

देवपूजा करा.

देवाला प्रसाद अर्पण करा. देवाला फक्त सात्विक गोष्टीच प्रसादात दिल्या जातात हे लक्षात ठेवा.

श्रीविष्णूंना प्रसाद अर्पण करताना त्यात तुळशीपत्र आवर्जुन ठेवा. श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे.

या दिवशी भगवान श्रीविष्णूंसोबत लक्ष्मीमातेचीही पूजा करा.

देवाचं ध्यान करा.