प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या अकराव्या दिवशी एकादशी तिथी साजरी केली जाते. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते. यावर्षी मोहिनी एकादशी तिथी कोणत्या तारखेला आहे? शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र आणि या एकादशीचे महत्त्व जाणून घ्या.
हिंदू धर्मात एकादशीचा उपवास भगवान विष्णूला समर्पित आहे. एकादशीच्या उपवासाने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते अशी पौराणिक मान्यता आहे. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते. हिंदू पंचांगानुसार, यावर्षी मोहिनी एकादशी तिथी शनिवार १८ मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल आणि रविवार १९ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी समाप्त होईल.
पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की, समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि असूरांना अमृताचे भांडे सापडले होते. यामुळे देव आणि असुर यांच्यात युद्ध झाले आणि देवतांवर असुरांचा विजय झाला होता. त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनी रुपाच्या जाळ्यात अडकवले आणि देवांना अमृताचे भांडे प्यायला दिले. त्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले. म्हणूनच मोहिनी एकादशी साजरी केली जाते.
मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. मोहिनी एकादशीचा उपवास करावा. मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर किंवा सकाळी लवकर उठून स्नान करावे. पण यादिवशी आपल्या शरिराला साबण लावू नये, साबण न लावताच आंघोळ करावी. या दिवशी भात किंवा भातापासून बनवलेले अन्न खाऊ नये.
भगवान विष्णूला अर्पण करताना तुळशीची पाने घालावीत. जरी उपवास नसला तरी मांस, मद्य, लसूण, कांदा यांसारख्या तामसिक गोष्टी खाऊ नयेत. या दिवशी फक्त सात्विक अन्नच सेवन करावे. धार्मिक कार्य करावे. गरिबांना दान द्यावे.
ॐ भूरिदा भूरी देहीनो, मा दवरं भूरिया भर. भूरी घेदिंद्र दितसी । ॐ भूरिदा तयासि श्रुताः पुरुत्र सुरा वृत्रहणा । ॐ भजस्व राधासी । ॐ ह्रीं कार्तविरार्जुनो नम राजा बहु सहस्रावण । यस्य स्मरेण मात्रेन हृतम् नास्तम च लभ्यते ।
संबंधित बातम्या