मराठी बातम्या  /  धर्म  /  Moharram 2024 : 'मोहरम' पासून होते मुस्लिम बांधवांच्या नव्या वर्षाची सुरूवात! जाणून घ्या इस्लामिक 12 महिन्यांची नावे

Moharram 2024 : 'मोहरम' पासून होते मुस्लिम बांधवांच्या नव्या वर्षाची सुरूवात! जाणून घ्या इस्लामिक 12 महिन्यांची नावे

Jul 10, 2024 03:11 PM IST

इस्लाममध्ये 'मोहरम' हा 'रमजान'नंतरचा दुसरा सर्वात पवित्र महिना मानला जातो. इस्लामिक कॅलेंडर 'हिजरी' कॅलेंडर म्हणून ओळखले जाते.

मोहरम २०२४, इस्लामिक १२ महिन्यांची नावे
मोहरम २०२४, इस्लामिक १२ महिन्यांची नावे

इस्लाम धर्मात रमजान आणि मोहरम या महिन्यांना जास्त महत्व आहे, हे अतिशय पवित्र महिने समजले जातात. या दोन महिन्यांना प्रचंड महत्व आहे. मात्र अनेकांना इस्लामिक कॅलेंडर आणि त्यातील महिन्यांबाबत फारशी माहिती नाही. तर इस्लाम धर्मात 'मोहरम' हा पहिला महिना आहे. मोहरमपासून मुस्लिम बांधवांच्या नव्या वर्षाची सुरूवात होते. मात्र विशेष म्हणजे इस्लाममधील पहिलाच महिना शोक व्यक्त करण्याचा असतो.

कारण याच महिन्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे दोन लाडके नातू इमाम हसन-हुसैन हे युद्धात शहीद झाले होते. त्यांच्या आठवणीत या दिवसांमध्ये दुःख व्यक्त केले जाते. नुकतंच देशभरात मोहरमला सुरुवात झाली आहे. जवळपास १४४५ सालापूर्वी हिजरी कॅलेंडरची सुरूवात करण्यात आली होती. मोहरमचे हे दहा दिवस मुस्लिमांसाठी प्रचंड महत्वाचे असतात.याकाळात सर्व दर्गेमध्ये पीर बसवले जातात.

ट्रेंडिंग न्यूज

'मोहरम' हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना आहे. इस्लाममध्ये हा दुःखाचा महिना मानला जातो. ८ जुलै २०२४ पासून मुस्लिमांचे नवीन वर्ष सुरू झाले आहे. ते २६ जुलै २०२५ पर्यंत असणार आहे. इस्लाममध्ये 'मोहरम' हा 'रमजान'नंतरचा दुसरा सर्वात पवित्र महिना मानला जातो. इस्लामिक कॅलेंडर हिजरी कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. जे ग्रेगेरियन कॅलेंडरपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. हिजरी कॅलेंडर चंद्राच्या हालचालींवर आधारित आहे.

नुकतंच इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना अर्थातच मोहरमला प्रारंभ झाला आहे. मोहरम हा इस्लामिक धर्मातील पहिला महिना आहे. इस्लाम धर्मातील कॅलेंडरमधील संकल्पनेला 'हिजरी' असे म्हटले जाते. तज्ञांच्या अभ्यासानुसार इस्लामिक कॅलेंडर आणि ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये प्रचंड मोठा फरक आढळतो. इस्लामिक कॅलेंडरमध्ये चंद्राच्या हालचालींवरुन तारखा निश्चित केल्या जातात. शिवाय ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये ३६५ दिवस असतात. तर इस्लामिक कॅलेंडरमध्ये ३५५ दिवस असतात. त्यामुळेच मोहरमची तारीख प्रत्येक वर्षी बदलत असते.

इस्लामिक कॅलेंडरमधील इतर ११ महिने

हिजरी कॅलेंडरनुसार हे १४४६ वर्ष सुरू आहे. इस्लामिक कॅलेंडर चंद्रानुसार कार्यरत असते. त्यामुळे नवीन तारीख सूर्यास्तानंतर म्हणजेच मगरीबच्या वेळी सुरू होते. आपण पाहिलं की मोहरम हा इस्लाममधील पहिला महिना आहे. मात्र बहुतांश लोकांनां इस्लाममधील इतर महिने अद्याप माहिती नाहीत. तर इस्लामिक कॅलेंडरनुसार इस्लाम धर्मात मोहरमनंतर सफर, रबीउल-अव्वल, रबीउल-आखिर, जुमादिल अव्वल, जुमादिल आखिर, रज्जब, शाअबान, रमजान, शव्वाल, जिल काअदह, जिलहिज्जा या महिन्यांचा समावेश होतो.

WhatsApp channel