Christmas Wishes: नाताळच्या शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणीत करा, पाठवा हे संदेश
मराठी बातम्या  /  धर्म  /  Christmas Wishes: नाताळच्या शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणीत करा, पाठवा हे संदेश

Christmas Wishes: नाताळच्या शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणीत करा, पाठवा हे संदेश

Updated Dec 24, 2023 12:38 PM IST

Christmas 2023 Wishes : येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव म्हणून नाताळ प्रत्येक वर्षाच्या २५ डिसेंबर रोजी साजरा करतात. हा दिवस उत्साहाने भरलेला असतो, आनंद द्विगुणीत करण्यासाठी ख्रिसमसला या शुभेच्छांचा वर्षाव करा.

Chrishtmas 2023 Wishes
Chrishtmas 2023 Wishes (Freepik)

Christmas Wishes news in marathi : आपली संस्कृती विविधतेने नटलेली आहे. वर्षभरात आपण सण-उत्सव साजरा करतो. वर्षाच्या शेवट देखील असाच गोड व्हावा म्हणून वर्षाअखेर पर्यंत कोणते ना कोणते सण येतच असतात. दरवर्षी २५ डिसेंबरला संपूर्ण जगभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण आहे.

नाताळ हा शब्द लॅटिन भाषेचा नातूय या शब्दापासून तयार झालेला असून, त्याचा अर्थ जन्म असा होतो. इंग्रजी भाषेत त्याला ख्रिसमस असे म्हणतात. नाताळ सणाच्या दिवशी ख्रिसमस ट्री सजवण्यात येते. सांता मुलांना भेट घेऊन येतो. या दिवशी भेटवस्तू देण्याला खास महत्व आहे.

सणांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या नातलगांना, मित्र-मैत्रिणींना आणि आपल्या संपर्कात असतील त्या सर्वांना शुभेच्छा देऊन सण साजरा करण्याची पद्धत झाली आहे. तेव्हा नाताळ सणालाही उत्साह वाढवा आणि सर्वांना हे शुभेच्छा संदेश पाठवा.

नाताळ सणाच्या शुभेच्छा -

सगळा आनंद, सगळं सौख्य

सगळ्या स्वप्नांची पूर्तता,

यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य

हे आपल्याला मिळू दे

ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

...

आला सांता घेऊन शुभेच्छा हजार

लहान मुलांसाठी भेटवस्तू आणि प्रेमाची बहार

तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

...

आयुष्यात ही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. 

आनंद नेहमी द्विगुणित होवो. 

मेरी ख्रिसमस

...

ख्रिसमस म्हटलं की, हॉलिडे आलाच. 

त्यामुळे ख्रिसमस सीझन म्हणजे हॉलिडे सीझन. 

या हॉलिडे सीझन आणि नाताळच्या तुम्हाला 

खूप खूप शुभेच्छा.

...

ख्रिसमसचा सण हा तुमच्या जीवनात

प्रेमाची भेट, शांतीची भेट, आनंदाचा खजिना

घेऊन येवो...मेरी ख्रिसमस

...

सांतासोबत धमाल करूया आणि गिफ्ट्स लुटूया

आपल्या सर्व मित्र-मैत्रिण आणि नातलगांना भेटूया

नाताळच्या खूप खूप शुभेच्छा देऊया

हॅपी ख्रिसमस

...

देवदूत बनून येईल सांता,

सर्व आशा होती पूर्ण ,

आनंदाच्या भेट देऊन जाईल सांता.

ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा

...

आला तो सण ज्याची बघत होतो वाट,

डिसेंबर घेऊन आला आहे आनंदाची बहार.

ख्रिसमसच्या भरपूर गोड गोड शुभेच्छा.

...

Whats_app_banner