मराठी बातम्या  /  धर्म  /  AgneePanchak : अग्नीपंचक म्हणजे काय? या दरम्यान कोणत्या गोष्टी करु नयेत?

AgneePanchak : अग्नीपंचक म्हणजे काय? या दरम्यान कोणत्या गोष्टी करु नयेत?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Nov 29, 2022 09:46 AM IST

Meaning Of Agnee Panchak : अग्नीपंचक आजपासून झालं सुरू झालं आहे. अशात आजपासून ते ४ डिसेंबरपर्यंत काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे. पाहुया.

अग्नीपंचक
अग्नीपंचक (हिंदुस्तान टाइम्स)

पंचक या शब्दाचा अर्थच मुळात शुभ कार्य न करणे असा होतो.ज्योतिष शास्त्रानुसार पंचक हे शुभ नक्षत्र मानलं गेलं नाहीये.जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा त्या काळाला पंचक म्हणतात. जेव्हा चंद्र या पाच राशीत प्रवेश करतो, पाच नक्षत्र म्हणजे घृष्ट, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती, त्या कालावधीला पंचक म्हणतात.हिंदू कॅलेंडरमध्ये पंचक असे नक्षत्र म्हटले आहे ज्यामध्ये शुभ कार्ये होत नाहीत.जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा त्या काळाला पंचक म्हणतात.

अग्नि पंचक म्हणजे काय?

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना अग्नी पंचक म्हणतात. या पाच दिवसांत तुम्हाला कोर्ट आणि कायदेशीर बाबींमध्ये अनुकूल परिणाम मिळतील. या पंचकमध्ये बांधकाम, साधने आणि यंत्रे सुरू करणे अशुभ मानले जाते.

अग्नी पंचकात कोणती कामं करु नयेत

या काळात कोणाचा मृत्यू झाला तर पुरोहिताचा सल्ला घेऊनच अंतिम संस्कार करावेत. या काळात कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याची धार्मिक धारणा आहे. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी पुजारी वेगवेगळ्या प्रकारे अंतिम संस्कार करतात.

अग्नी पंचक दरम्यान कोणतेही शुभ कार्य वैध नाही.

पंचक काळात लाकूड किंवा लाकूड संबंधित वस्तू खरेदी केल्या जात नाहीत.

पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करणे अशुभ मानले जाते कारण ही दिशा यमराजाची आहे.

पंचक काळात घराच्या छताचे बांधकाम किंवा नूतनीकरण करू नका.

पंचक कालावधी

२९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर

WhatsApp channel

विभाग