हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला बरेच महत्त्व आहे. आज (९ फेब्रुवारी) माघ अमावस्या म्हणजेच, मौनी अमावस्या आहे. या दिवशी पवित्र स्थानांवर स्नान करून पितरांच्या नावाने शुभ कार्य करण्याची विशेष परंपरा आहे. या दिवशी उपवास केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी केलेले उपायदेखील दुहेरी फळ देतात.
यंदा मौनी अमावस्येला महोदय योग, कालयोग, सर्वार्थ सिद्धी योग असे अनेक शुभ योग आहेत. अशा स्थितीत पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी केलेल्या उपायांचा तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मौनी अमावस्येला पितृदोष दूर करण्याचे सोपे उपाय.
१) मौनी अमावस्येला पितरांच्या नावाने काळे तीळ दान करा. हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासोबतच व्यक्तीला संपत्तीशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही.
२) मौनी अमावस्येला शनिदेव आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला दूध, गंगाजल, काळे तीळ आणि गोड पाणी अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला शनिदोष आणि पितृदोष या दोन्हीपासून मुक्ती मिळेल.
३) मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. तसेच, पिंपळाच्या झाडाला १०८ वेळा प्रदक्षिणा घालणे खूप फायदेशीर आहे. या दिवशी पिंपळाचे झाड लावणे देखील चांगले आहे. सकाळ संध्याकाळ पिंपळाच्या झाडावर दिवा लावावा.
४) मौनी अमावस्येच्या दिवशी खीर बनवण्यालाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी खीर करून ब्राह्मणाला खाऊ घाला, गरजू व्यक्तीला खीर खायला द्या आणि गायीलाही अर्पण करा. असे केल्याने तुमचे पूर्वज प्रसन्न होतील आणि तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळेल.
५) मौनी अमावस्येच्या दिवशी तीर्थस्थळी जाऊन स्नान करा. जर तुम्हाला जमत नसेल तर गंगाजल मिसळून घरीच स्नान करा. सोबतच गंगाजलाने भगवान शंकराचा अभिषेक करा आणि पाच अंजली जल तुमच्या पूर्वजांचे नावाने अर्पण करा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या