Margashirsha Purnima: कधी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा? या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Margashirsha Purnima: कधी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा? या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय!

Margashirsha Purnima: कधी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा? या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय!

Dec 12, 2024 02:01 PM IST

Margashirsha Purnima: मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे वर्षाची शेवटची पौर्णिमा. यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. १४ तारखेला पौर्णिमेची तारीख संध्याकाळी ०४ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी १५ तारखेला ०२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत चालेल.

कधी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा? या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय!
कधी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा? या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय!

Margashirsha Purnima: मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे वर्षाची शेवटची पौर्णिमा. यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. १४ तारखेला पौर्णिमेची तारीख संध्याकाळी ०४ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी १५ तारखेला ०२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत चालेल. याच दिवशी दत्तात्रेय जयंतीही आहे. पौर्णिमा १५ तारखेला असते, पण उपवास करणाऱ्यांसाठी पौर्णिमा १४ तारखेला असते, कारण या दिवशी पौर्णिमेचा चंद्र दिसणार आहे. १५ तारखेला स्नान आणि दानाची पौर्णिमा असते. अधिकमासाच्या पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान करण्याची परंपरा आहे. जर काही कारणास्तव तुम्ही नद्यांमध्ये स्नान करू शकत नसाल तर घरात पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे. या पौर्णिमेनंतर पौष महिना सुरू होईल. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते. म्हणून हा सण चंद्र देव, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे.

पौर्णिमा तिथी प्रारंभ : दुपारी ४:५८ १४ डिसेंबर २०२४

पौर्णिमा तिथी समाप्त : ०२:३१ दुपारी १५ डिसेंबर २०२४

मार्गशीर्ष पौर्णिमा उपाय

पिंपळाच्या झाडाजवळ लावा दिवा!

पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा. त्याआधी दूध व गुलाब पाण्यात टाकून ते पिंपळाला अर्पण करावे. असे म्हटले जाते की  असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आण तिची आपल्यावर कृपा राहते.

घराबाहेर लावा तुपाचा दिवा!

पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्यावर तिची कृपा राहते.

घरात केळीच्या पानांचा मंडप सजवा!

पौर्णिमेच्या दिवशी घरात केळीच्या पानांचा मंडप तयार करून तो सजवावा. त्यानंतर स्नान करावे आणि मोठ्या भक्तीभावाने भगवान सत्यनारायणाची कथेचे वाचन करावे. भगवंताला पंचामृत व पंजिरीचा भोग द्यावा. तसेच माता लक्ष्मीला ओढणी अर्पण करावी. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.

Disclaimer: या लेखात दिलेले उपाय पूर्णपणे खरे आणि अचूक आहेत असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner