Margashirsha Purnima: या वर्षाची शेवटची पौर्णिमा, अर्थात मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही रविवार, दिनांक १५ डिसेंबर या दिवशी आहे. हा पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला समर्पित आहे. मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीकृष्णाचा महिना मानला गेला आहे. या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते, अशी श्रद्धा आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील ही पौर्णिमा अगाहन पौर्णिमा, बत्तीसी पौर्णिमा, मोक्षदायिनी पौर्णिमा अशा नावांनीही ओळखली जाते. अशी मान्यता आहे की, मार्गशीर्ष पौर्णिमेचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि तपस्या यांचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी हरिद्वार, बनारस, मथुरा आणि प्रयागराज इत्यादी ठिकाणांहून लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि तपश्चर्या करण्यासाठी येतात.
मार्गशीर्ष पौर्णिमा पुढील महिन्यात १४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०४ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होईल आणि १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२ वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होईल.
स्नान दान - सकाळी ०५ वाजून १७ मिनिटांपासून ते सकाळी ०६ वाजून १२ मिनिटांपर्यंत
सत्यनारायण पूजा - सकाळी ०८ वाजून २४ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून १६ मिनिटांपर्यंत
चंद्रोदयाची वेळ - संध्याकाळी ०५ वाजून १४ मिनिटांनी
असे मानले जाते की, मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान विष्णू गंगेच्या पाण्यात वास करतात. त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने भक्ताला शुभ फळ मिळते, अशी मान्यता आहे. तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवता आणि देवी लक्ष्मीची पूजा व उपवास करण्याचा नियम आहे. या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या दानाचे इतर पौर्णिमेच्या दिवसांपेक्षा ३२ पट अधिक फळ मिळते. यामुळेच या दिवशी धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना वर्षाच्या पौर्णिमेला केलेल्या दान आणि उपासनेइतकेच फळ मिळते, असे म्हटले गेले आहे.
मार्गशीर्ष पौर्णिमेला तुळशीला लाल कलव, लाल चुनरी आणि कच्चे दूध अर्पण करावे. तसेच सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते. आर्थिक लाभ आणि यश मिळते अशी मान्यता आहे.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून भगवान नारायणाची पूजा केली जाते. पूजेनंतर ओम नमो नारायणाचा जप करतात. यावेळी देवाला सुगंध आणि फुले अर्पण करावीत. पूजेच्या ठिकाणी वेदी बनवून तेथे हवन करावे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.