Margashirsha Guruvar Udyapan Aarti: मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार, उद्यापन करताना या चुका टाळा-margashirsha guruvar udyapan mahalakshmi aarti and do or dont things ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Margashirsha Guruvar Udyapan Aarti: मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार, उद्यापन करताना या चुका टाळा

Margashirsha Guruvar Udyapan Aarti: मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार, उद्यापन करताना या चुका टाळा

Jan 11, 2024 01:15 PM IST

Margashirsha Guruvar Vrat 2024: मार्गशीर्ष महिन्याचा आज शेवटचा दिवस आणि शेवटचा गुरुवार आहे. अशात महालक्ष्मी व्रताची आज सांगता होईल. जाणून घ्या उद्यापन कसे करावे, महालक्ष्मीची आरती आणि मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करताना या चुका टाळा.

margashirsha guruvar udyapan 2024
margashirsha guruvar udyapan 2024

मार्गशीष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. मार्गशीष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मींसोबतच श्री विष्णूंची देखील पूजा-आराधना केल्यास आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबावर सदैव लक्ष्मी-नारायणांचा आर्शिवाद प्राप्त होतो.

उद्यापन पूजा विधी

ज्या ठिकाणी घरात मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढा. त्यानंतर चौरंग किंवा पाट ठेवा. चौरंगावर लाल कपडा परिधान करुन त्यावर तांदूळ घालून त्यावर तांब्याचा कलश स्थापन करा. कलशाला हळद-कुंकु लावून आत दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घाला. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवा. त्यानंतर एक नारळ ठेवा. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवा. आपण आपल्या इच्छेप्रमाणे आणि शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवा.

या चुका टाळा

वाईट मनाने पूजा करू नका. पूजा करताना मन शांत ठेवा. वाद-विवाद टाळा. कुटूंबातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका. उद्यापन करताना कलश हलवल्यावर कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे. इथे तिथे फेकू नये. गजरा, फुलं केसांमध्ये माळावी. दुर्वा नारळ पूजेचे साहित्य वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे.

सुपारी, नारळ आहारात वापरता येईल, परंतू आहारात वापरायचे नसल्यास ते देखील वाहत्या पाण्यात विसर्जीत करावे, जवळच्या मंदिरात ठेऊन यावे किंवा प्रसाद म्हणून वाटून द्यावे. हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वत:साठी वापरावे.पूजेतील साहित्याचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी.

श्री महालक्ष्मीची आरती

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।

वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।

पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।

कमलाकारें जठरी जन्मविला धाता।

सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥

जय देवी जय देवी…॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।

झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।

माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।

शशिकरवदना राजस मदनाची जननी॥

जय देवी जय देवी…॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।

सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।

गायत्री निजबीजा निगमागम सारी।

प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥

जय देवी जय देवी…॥

अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।

मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।

वारी मायापटल प्रणमत परिवारी।

हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥

जय देवी जय देवी…॥

चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।

लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।

पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।

मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥

जय देवी जय देवी…॥