Margashirsha Guruvar: मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Margashirsha Guruvar: मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व!

Margashirsha Guruvar: मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व!

Dec 12, 2024 10:41 AM IST

Margashirsha Guruvar: मार्गशीर्ष महिन्यात एकूण ४ गुरुवार आहेत. यांपैकी पहिला गुरुवार हा ५ डिसेंबर रोजी होता. तर दुसरा गुरुवार हा आज म्हणजेच १२ डिसेंबर रोजी आहे. यंदा मार्गशीर्ष महिना २ डिसेंबर २०२४ पासून सुरु झाला आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करता.

मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व!
मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व!

Margashirsha Guruvar: हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष धार्मिक महत्व आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते. या महिन्यात दर गुरुवारी महिला मोठ्या भक्तीभावाने महालक्ष्मीचे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार, या व्रतामुळे भक्तांना यश, समृद्धी आणि वैभवासह माता लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडला जातो. या दिवशी माहिला महालक्ष्मीची पूजा करून उपास करतात.

कशी करावी पूजा ?

> मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे. > त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवावे. त्यावर तांदूळ पसरून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. > कलशाला हळदी-कुंकू लावावा. > कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा, नाणे आणि सुपारी टाकावी. > कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावा. त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवावे. > पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी. > त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा.

> विडा, खोबरे, फळे, खडीसाखर आणि गूळ ठेवावा.

> त्यानंतर महालक्ष्मीची विधीवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचावी, नैवेद्य दाखवून देवीची आरती करावी.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तारीख

दुसरा मार्गशीर्ष गुरुवार – १२ डिसेंबर २०२४

तिसरा मार्गशीर्ष गुरुवार : १९ डिसेंबर २०२४

चौथा मार्गशीर्ष गुरुवार : २६ डिसेंबर २०२४

असा आहे शुभ मुहूर्त

मार्गशीर्ष महिन्याचा आज दुसरा गुरुवार आहे. या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ०५ वाजून २६ मिनिटांपासून सुरू होऊन ते ०७ वाजून ४० मिनिटांपर्यंत आहे. तसेच गुरुवारी मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी रात्री १० वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील.

काय आहे मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व?

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना शुभ मानला गेला आहे. या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे या महिन्यात पूजेसारखी शुभ कार्ये अधिक फलदायी ठरतात अशी मान्यता आहे. मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात. त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करण्याची हिंदू धर्मात पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner