मंगळवार ९ एप्रिल २०२४ रोजी, चैत्र महिना प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नव वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन ही मराठी महिन्यांची नावे आहेत.
गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणून साजरा केला जातो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते. चैत्र ते फाल्गुन या संपूर्ण वर्षात सर्व महत्वाचे सण-उत्सव कोणत्या तारखेला व वाराला आहे जाणून घ्या.
चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा दि ९/४/२०२४ मंगळवार
श्रीराम नवमी - १७/४/२०२४ बुधवार
हनुमान जयंती - २३/४/२०२४ मंगळवार
अक्षय तृतीया - १०/५/२०२४ शुक्रवार
नृसिंह जयंती - २१/५/२०२४ मंगळवार
वटपौर्णिमा - २१/६/२०२४ शुक्रवार
गुरु पौर्णिमा - २१/७/२०२४ रविवार
नागपंचमी - ९/८/२०२४ शुक्रवार
रक्षाबंधन - १९/८/२०२४ सोमवार
गोकुळ अष्टमी - २६/८/२०२४ सोमवार
पोळा - २/९/२०२४ सोमवार
हरितालिका - ६/९/२०२४ शुक्रवार
गणेश पार्थिव पुजन - ७/९/२०२४ शनिवार
गौरी आवाहन - १०/९/२०२४ मंगळवार
अनंत चतुर्दशी - १७/९/२०२४ मंगळवार
सर्वपित्री अमावस्या - २/१०/२०२४
शारदीय नवरात्रारंभ - ३/१०/२०२४ गुरुवार
विजयादशमी - १२/१०/२०२४ शनिवार
कोजागिरी पौर्णिमा - १६/१०/२०२४ बुधवार
नरकचतुर्दशी - ३१/१०/२०२४ गुरुवार
लक्ष्मीपूजन - १/११/२०२४ शुक्रवार
बलिप्रतिपदा - २/११/२०२४ शनिवार
भाऊबीज - ३/११/२०२४ रविवार
चंपाषष्ठी - ७/१२/२०२४ शनिवार
दत्त जयंती - १४/१२/२०२४ शनिवार
मकरसंक्रांत - १४/१/२०२५ मंगळवार
गणेश जयंती - १/२/२०२५ शनिवार
वसंत पंचमी - २/२/२०२५ रविवार
रथसप्तमी - ४/२/२०२५ मंगळवार
महाशिवरात्र - २६/२/२०२५ बुधवार
होळी - १३/३/२०२५ गुरुवार
छ.शिवाजी महाराज जयंती - १६/३/२०२५ रविवार
संबंधित बातम्या