Good Morning Wishes: दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा; ‘हे’ मेसेज पाठवून प्रियजनांना शुभ सकाळ म्हणा!-marathi good morning wishes say good morning to your loved ones by sending this message ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा; ‘हे’ मेसेज पाठवून प्रियजनांना शुभ सकाळ म्हणा!

Good Morning Wishes: दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा; ‘हे’ मेसेज पाठवून प्रियजनांना शुभ सकाळ म्हणा!

Sep 12, 2024 07:38 AM IST

Marathi Good Morning Wishes: सुप्रभात! या शब्दांमध्ये किती सकारात्मक ऊर्जा दडलेली असते. एक छोटसा संदेश, पण आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी मोठा प्रेरणादायी ठरतो.

Good Morning Wishes:‘हे’ मेसेज पाठवून प्रियजनांना शुभ सकाळ म्हणा!
Good Morning Wishes:‘हे’ मेसेज पाठवून प्रियजनांना शुभ सकाळ म्हणा!

Good Morning Wishes In Marathi: दररोज सकाळी आपण एक नवीन सुरुवात करतो. आपला दिवस कसा जाणार आहे, हे आपल्या पहिल्या विचारांवर अवलंबून असते. एक सकारात्मक विचार आपल्याला संपूर्ण दिवसासाठी ऊर्जावान बनवू शकतो. गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्याच्या माध्यमातून आपण स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना प्रेरित करू शकतो आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. सुप्रभात! या शब्दांमध्ये किती सकारात्मक ऊर्जा दडलेली असते. एक छोटसा संदेश, पण आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी मोठा प्रेरणादायी ठरतो. आपण दररोज ज्या व्यक्तीला भेटतो त्यांना एक सुंदर शुभेच्छा देऊन आपण त्यांचा दिवस उजळवू शकतो.

 

मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे 

आणि या संपत्तीपेक्षा, 

जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही!

शुभ सकाळ!

 

-------------------------

 

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,

कारण साखर आणि मीठ

दोघांना एकच रंग आहे!

 

-------------------------

 

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं,

पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली,

ते घरटं कधी विसरु नये!

शुभ सकाळ

 

-------------------------

 

रात्र ओसरली दिवस उजाडला,

तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,

चिलमील किरणांनी झाडे झळकली,

सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…

शुभ प्रभात!

 

-------------------------

 

आपल्यात लपलेले परके

आणि परक्यात लपलेले आपले

जर तुम्हाला ओळखता आले तर,

आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ

आपल्यावर कधीच येणार नाही.

शुभ सकाळ!

 

-------------------------

 

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला

कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका.

कारण दिवा विझायला नेहमी

हवाच कारणीभूत नसते,

कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.

शुभ सकाळ!

-------------------------

 

सत्याची महानता फार मोठी आहे, 

सत्य बोलणारा मनाने शांत असतो,

सत्याचे परिणाम कसेही झाले, 

तरी तो त्याला तोंड देतो.

कारण त्याला माहीत असते, 

विजय हा सत्याचाच होतो!

 

-------------------------

 

जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर,

आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,

ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद,

कधीच कमी होऊ देत नाही!

शुभ सकाळ!

 

-------------------------

 

मित्र गरज म्हणून नाही,

तर सवय म्हणून जोडा.

कारण गरज संपून जाते,

पण सवय कधीच सुटत नाहीत!

शुभ सकाळ

 

-------------------------

 

तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते,

जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल,

तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी!

शुभ सकाळ! 

Whats_app_banner
विभाग