Manoj Modi trimbakeshwar : रिलायन्सचे उपाध्यक्ष मनोज मोदी यांच्याकडून त्र्यंबकेश्वराच्या चरणी सव्वा किलो सोने दान
मराठी बातम्या  /  धर्म  /  Manoj Modi trimbakeshwar : रिलायन्सचे उपाध्यक्ष मनोज मोदी यांच्याकडून त्र्यंबकेश्वराच्या चरणी सव्वा किलो सोने दान

Manoj Modi trimbakeshwar : रिलायन्सचे उपाध्यक्ष मनोज मोदी यांच्याकडून त्र्यंबकेश्वराच्या चरणी सव्वा किलो सोने दान

Jan 17, 2025 10:41 AM IST

Manoj Modi at Trimbakeshwar Temple : रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी नाशिक येथील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वराच्या चरणी सव्वा किलो सोने दान केले.

Manoj Modi trimbakeshwar : रिलायन्सचे उपाध्यक्ष मनोज मोदी यांच्याकडून त्र्यंबकेश्वराच्या चरणी सव्वा किलो सोने दान
Manoj Modi trimbakeshwar : रिलायन्सचे उपाध्यक्ष मनोज मोदी यांच्याकडून त्र्यंबकेश्वराच्या चरणी सव्वा किलो सोने दान

Manoj Modi offered Gold in Ttimbakeshwar Mandir: रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी नाशिक येथील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वराच्या चरणी सव्वा किलो सोने दान केले. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात प्रथमच इतके मोठे सुवर्णदान मिळाले आहे. मोदी गेल्याच महिन्यात त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्याचवेळी मोदी यांनी त्र्यंबकेश्वरसाठी सुवर्ण दान करण्याचा संकल्प केला होता. त्यानंतर आज त्यांनी आपले सहकारी हितेशभाई यांच्या मार्फत सव्वा किलो सोने दान दिले. ही माहिती श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी दिली आहे.

त्र्यंबकेश्वराला सोन्याचा मुकूट चढवण्याचा होता संकल्प

सुमारे दोनशे वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला त्र्यंबकेश्वरचा सुवर्ण मुखवटा नवीन बनवण्याचा संकल्प श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आला होता. जेव्हा मनोज मोदी त्र्यंबकेश्वर मंदिरात आले, तेव्हा त्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यांतर सुर्वणदानाचा संकल्प मोदी यांनी बोलून दाखवला. त्यानंतर मनोज मोदी यांनी त्यांचे प्रतिनिधी हितेश भाई यांना पाठवून हे दान दिले. सुवर्ण पट्टी आणि नाणे स्वरूपात हे दान आहे. जवळपास एक कोटी रुपये या सोन्याची किंमत आहे. यावेळी मंदिरात हितेश भाई यांनी सपत्नीक अभिषेक केला.

साडेआठ किलोचा मुकूट बनवण्याचा संकल्प

त्र्यंबकेश्वराला साडेआठ किलो सोन्याचा मुखवटा बनवण्याचा संकल्प ट्रस्टने केला होता. देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानतून हा मुकूट बनविण्यात येणार आहे. या मुकुटासाठी मंदिर ट्रस्टकडे एकूण पाच किलोहून अधिक सोने देवस्थानकडे जमा झालेले आहे. मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो अशी भावना आपल्या त्र्यंबकेश्वरच्या भेटीत व्यक्त केली होती. परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दान करण्यासाठी इच्छुक आहेत. असे भाविक अजूनही १२५ तोळे दान देऊ शकणार होते. त्या अनुषंगाने मोदी यांचे सहकारी हितेशभाई यांनी सपत्नीक येऊन रीतसर संकल्प करून सदर सव्वा किलो सोने देवस्थानकडे सुपूर्द केले.

त्र्यंबकेश्वर मंदिराकडून हितेशभाई यांचा सत्कार

दरम्यान, याप्रसंगी मनोज तुंगार व आर्यन तुंगार यांच्यासह मंदिरातील पुरोहितांनी हितेशभाई यांना आशीर्वाद दिला. तसेच हितेशभाई यांना सुवर्णदानाची पावती देत श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास घुले, रूपाली भुतडा,मनोज थेटे, सत्यप्रिय शुक्ल, स्वप्निल शेलार, प्रदीप तुंगार, मंदिर पुजारी मनोज तुंगार, देवस्थानचे अधिकारी समीर वैद्य व रश्मी जाधव हे उपस्थित होते.

Whats_app_banner